ऐनपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..
ऐनपुर प्रतिनिधी – ( विजय एस अवसरमल )
ऐनपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ता.रावेर येथे ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सरपंच अमोल महाजन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन केले ग्रामपंचायत चे सदस्य यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले सहा डिसेंबर हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सर्वांना ठाऊक असतो अनेकांना राजकीय सामाजिक माहिती असते बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी जीवनभर कार्य केले गोलमेज परिषद गाजवली पुणे करार त्याच प्रमाणे भारताची घटना लिहिली भारतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा ग्रंथ वेडा कोणीही नव्हता व होणार ही नाही लोक कुटुंबा साठी घर महाल आणि राजवाडे बांधतात परंतु ग्रंथासाठी भव्य वास्तू बांधणारे बाबासाहेब हे एक मेव आहे बाबासाहेबांनी आपला मृत्यू कसा यावा यावर विचार केला असावा किंवा नसावा पण या महामानवाला मृत्यूची चाहूल लागताच आपले शेवटचे दिवस अत्यंत प्रिय असलेल्या ग्रंथांच्या सहवासात घालवले पाच डिसेबर रोजी बाबासाहेब आपल्या ग्रंथ संपत्ती जवळ बसले आणि उठतानी कधी नव्हे ते “चल उठाले कबिरा तेरा भवसागर डेरा हा दोहा मोठ्याने बोलू लागले यानंतर बिछान्यात झोपल्या वर त्यांनी टेबलवर असलेले सर्व ग्रंथांना चाळून पाहिले व झोपी गेले अश्या प्रकारे पाच डिसेंबर ला महामानवाच्या जीवनात शेवटचा सूर्य आला असे प्रास्ताविकात विजय एस अवसरमल यांनी सांगितले बाबासाहेबांच्या जीवनावर अरविंद महाजन यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमाला सरपंच अमोल ,महाजन किशोर पाटील ,पवन पाटील ,अनिल जैतकर सतिष अवसरमल विलास अवसरमल अतुल पाटील पृथ्वीनाथ जैतकार रवींद्र महाजन दैनिक महाराष्ट्र सारथी चे प्रतिनिधी विजय एस अवसरमल दैनिक मंडे टू मंडे प्रतिनिधी विजय के अवसरमल राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुका सरचिटणीस अरविंद महाजन ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.