ग्रामीण भागात शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा किलबिलाट..

ऐनपूर ता.रावेर – प्रतिनिधी –

ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिर येथे १ डिसेंबर पासून शासन आदेशानुसार शाळा सुरू करण्यात आली.गेल्या वीस महिन्यापासून शाळेचे अध्यापन कार्य ऑनलाइन पद्धतीने चालू होते परंतु शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी व पालकवर्गत उत्साह बघायला मिळाला.व आज पासून प्रत्यक्ष व नियमित अध्यापनास शाळेत सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांचा हा उत्साह बघून संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प तसेच बिस्कीट व चॉकलेट देऊन करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील,चेअरमन श्रीराम पाटील,सचिव संजय पाटील,उपाध्यक्ष रामदास पाटील,संचालक हरी पाटील,पी.आर.चौधरी,एन.व्ही.पाटील,पी.एम.पाटील,डॉ.सतीश पाटील,कैलास पाटील,सहसचिव आर.एस.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच पालक व शाळेतील शिक्षक यांच्याहस्ते देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.पहिल्याच दिवशी शाळेच्या पटावरील १५० विद्यार्थ्यापैकी ६०% उपस्थिती आज शाळेत विद्यार्थ्यांची दिसून आली.
शाळेत सर्व प्रथम विद्यार्थांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली.त्याचे शरीर तापमान तपासून त्यांना शाळेत प्रवेश दिला गेला.तसेच सोशियल डिस्टनसिग पाळण्याच्या सूचना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिल्या.व शाळेच्या आवारात वावरताना नियमित मास चा वापर करावा असे सांगितले व वेळोवेळी आपले हात साबणाने स्वछ करण्यास सांगण्यात आले.व शासनाने सांगितलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले व पालकांकडून त्यासंबंधीचे समतीपत्रक भरून घेण्यात आले.
तसेच आज शाळेचे व्यवस्थापक आर.टी. महाजन सर यांचा वाढदिवस असल्याने त्यांचादेखील शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी केले.पी.एम.पाटील,एन.व्ही.पाटील,रामदास महाजन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना व अध्यक्षीय भाषणात भागवत पाटील यांनी विद्यार्थाना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सांगितले. सूत्रसंचालन आरती पाटील व आभार कल्याणी शिंदे यांनी मानले.व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!