सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर यांच्या कडून ग्रामपंचायत ऐनपुर यांच्या पत्राला केराची टोपली.

ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)

ऐनपुर ता.रावेर येथील ग्रामपंचायत कार्यालय यांच्या कडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सो.यांना नविन निंबोल ते ऐनपुर रोड च्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे काढण्याबाबत पत्र दिले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी सो.व सरपंच सो.यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सो.यांना नविन निंबोल ते ऐनपुर व खिर्डी रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढलेली असून त्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे झाड झुडपे कापून साफसफाई करून साइडपट्या साफ करून ऐनपुर ते खिर्डी रस्त्यावर पावसामुळे रोडवर पाणी साचत असून वाहतूक करणारे वाहने व कॉलेज मध्ये जाणारे विद्यार्थी व पुनर्वसन मध्ये जाणारे ग्रामस्थ यांना जाणे येण्यास त्रास होत आहे म्हणून सब स्टेशन ते वसंत बाबुराव पाटील यांच्या घरापर्यंत तीन फूट रुंदीची एक मोठी गटार बांधून मिळावी जेणे करून जाणाऱ्या येणाऱ्यांची हाल होणार नाही या आशयाचे पत्र ऐनपुर ग्रामपंचायत ने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे या रोडने अपघात होण्याची दाट शक्यता असून या पत्राला सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले असून केराची टोपली दाखवली आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का असे नागरीकांकडून बोलले जात आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!