तामसवाडी मोरगाव शिवारातील शेतकऱ्यांकडून ई पिकपेरा नोंदणी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसादः-
ऐनपुर प्रतिनिधी-( विजय एस अवसरमल)
रावेर तालुक्यातील तलाठी सजा मोरगाव यांचेकडून तामसवाडी मोरगाव शिवारातील शेतकऱ्यांना आपले पिकांची ई पिकपेरा नोंदणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यास सुरूवात केलेली असुन याकामी शेतकऱ्यांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तलाठी सजा मोरगाव खुर्द येथील तलाठी काजल पाटील यांनी उत्साहपूर्ण आणि यशस्वीरित्या सुरूवात केलेली असुन तलाठी पाटील यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास तामसवाडी आणि मोरगाव शिवारातील शेतकऱ्यांकडून तितक्याच उत्सुकतेने सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
तलाठी पाटील हे विविध शेतकर्याच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन ई पिकपेरा नोंदणीचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत.असेच दि.२३/०८/२०२१ सोमवार रोजी मौजे तामसवाडी शिवारातील महेंद्र जवाहरलाल पाटील यांचे शेतात ई पिकपेरा नोंदणी विषयक प्रात्यक्षिक करून दाखवले,यावेळी त्यांच्यासोबत तामसवाडी गावचे पोलीस पाटील सुलक्षणा राजेश रायमळे,कोतवाल कैलास कोळी माजी उपसरपंच नरेंद्र कोळी आणि स्वतः प्रगतशील शेतकरी महेंद्र जवाहरलाल पाटील उपस्थित होते.