चोपडा महाविद्यालयात विवोनी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे तर्फे ऑनलाईन रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन…

दैनिक महाराष्ट्र सारथी चोपडा प्रतिनिधी

‘चोपडा महाविद्यालयात विवोनी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे तर्फे ऑनलाईन रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन’
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील ट्रेनिंग ॲड प्लेसमेंट सेल तर्फे ‘ऑनलाईन रोजगार भरती मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष मा.भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील व सचिव ताईसाहेब डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. या मेळाव्याच्या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विवोनी प्रायव्हेट लिमिटेड, पुणेचे मा.श्री.विभव टाके, मा.श्री.द्वारागा चारी हे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, आय.क्यु.ए.सी.चे समन्वयक श्री.डी.एस.पाटील तसेच ट्रेनिंग ॲड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.के.डी.गायकवाड, समिती सदस्य श्री.डी.डी.कर्दपवार, श्री.एम.ए.पाटील आदि ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ.के.डी.गायकवाड (समन्वयक, ट्रेनिंग ॲंड प्लेसमेंट सेल) यांनी करून दिला. प्रास्ताविक करतांना डॉ.के. डी. गायकवाड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचे सोने करायला पाहिजे तसेच सध्याच्या युगात नेहमी स्वतःमध्ये कौशल्य विकसित करायला हवीत.
या कार्यक्रमाप्रसंगी विवोनी प्रायव्हेट लिमिटेड, पुणेचे मा.श्री.विभव टाके विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास साधून स्वतःमधील आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे, तरच आजचा विदयार्थी स्पर्धेत टिकू शकतो. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना विवोनी प्रायव्हेट लिमिटेड संदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयाने केलेल्या सहकार्याबद्दल, आयोजन व नियोजनाबाद्दल गौरवोद्गार काढले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी अध्यक्षीय भाषण करतांना म्हणाले की, आजच्या काळात नोकरी मिळविणे खूप जिकीरीचे काम झाले आहे, त्यामुळे युवकांनी कठोर परिश्रम करून जिद्दीने अंगी असलेल्या कौशल्यांचा विकास करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. विविध कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थ्यांनी शिकत असतांना भविष्याचा विचार करायला हवा, तरच भविष्य उज्वल होईल. यावेळी त्यांनी महाविद्यालयात ‘ऑनलाईन रोजगार भरती मेळाव्याच्या’ आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून कौतुक केले. यावेळी विवोनी प्रायव्हेट लिमिटेड समूहातील सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.एम.ए.पाटील यांनी केले तर आभार श्री.डी.डी.कर्दपवार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती सदस्यांनी सहकार्य केले. या नोकरी मार्गदर्शन मेळाव्यामध्ये एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच याप्रसंगी प्राध्यापक बंधू-भगिनी, व बहुसंख्य विदयार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!