तुळशीराम चंद पाटील यांचा कृषी मित्र पुरस्काराने गौरव
जालना प्रतिनिधी
27 जुलै
वनशेती चळवळीत पुढाकाराने अग्रगण्य रित्या कार्यरत असलेले येथील मराठा सेवा संघ प्रणित कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद पाटील यांना कृषी मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कृषी मित्र प्रतिष्ठान काटोल जि. नागपूर यांच्या वतीने दिला कृषी मिञ जाणारा पुरस्कार तुळशीराम चंद पाटील यांना घोषित करण्यात आला. नुकतेच या पुरस्काराचे वितरण काटोल चे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर, कृषी मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश ठाकरे, विनायकराव भुसारे पाटील ( मुंबई), नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य भूषण निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उद्योगपती परेश पटेल( गुजरात), वंजारी यांची उपस्थिती होती.
अस्मानी आणि सुलतानी संकटाने तोट्यात असलेल्या शेतीव्यवसायाला सुगीचे दिवस यावे, उत्पन्न वाढून शेतकर्यांच्या पदरात दोन पैसे पडावेत. आत्महत्येच्या मार्गावरून शेतकरी परावृत्त व्हावा. या दृष्टीने पारंपारिक शेती शिवाय तुळशीराम चंद पाटील यांनी चंदन ,महोगणी अशा वृक्षलागवडीची संकल्पना राबवून संपूर्ण महाराष्ट्रभर वनशेती चळवळ उभारली व ती नेटाने राबवत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत कृषी मित्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास निपाणी पोखरी चे सरपंच विलासराव भुतेकर , विलास देशमुख, सावळाराम भुतेकर, ज्ञानेश्वर कापसे पाटील, शुभम खरात, परमेश्वर खरात( सि. राजा) परसराम महात्मे पाटील ( पाथरी),धनंजय धांडे ( मेहकर),कृष्णा शिरसाट ( बदनापुर) ,गोविंद खरात ( वाघ्रुळ) यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील शेतकर्यांची उपस्थिती होती.
दरम्यान पुरस्कार मिळाल्याबद्दल
तुळशीराम चंद पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुरस्काराने आपल्या कार्याची जवाबदारी वाढली आहे. असे तुळशीराम चंद पाटील यांनी सांगितले.