बसवराज बोम्माई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड

बंगळुरू

27 जुलै

भाजप सरकारने दोन वर्षे कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी खांदेपालट केला आहे. मुख्यमंत्रिपदाचा बी. एस. येडियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कर्नाटकचे भाजप प्रभारी अर्जुन सिंह यांनी मंगळवारी सांयकाळी नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार बसवराज बोम्माई यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे.

कर्नाटकचे भाजप प्रभारी अर्जुन सिंह म्हणाले, की भाजपच्या आमदारांची मंगळवारी सायंकाळी बैठक बोलाविण्यात आली होती. कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणे हा बैठक बोलाविण्यामागे उद्देश होती. कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव आज (मंगळवारी) जाहीर करण्यात येणार आले. विधानसभेतील भाजपच्या सभागृह नेत्याचे नावदेखील निश्चित करण्यात येणार आहे. कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री उद्या शपथ घेणार आहेत. त्यानंतर आठवडाभराने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कर्नाटकमधील मतांचे जातनिहाय गणित बघता कोणत्या समुदायातील नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अखेर लिंगायत समुदायाला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळाले आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही होती नावे-

ः कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत समुदायाचे वर्चस्व निर्विवाद आहे. राज्याच्या सत्तेची गणिते ठरविण्यात लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरतात. त्यामुळे लिंगायत समाजातील एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळते की लिंगायत समाजाव्यतिरिक्त इतर समुदायातील नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ज्यांची नावे चर्चिली जात आहेत, त्यापैकी मुरुगेश निराणी आणि अरविंद बेल्लाड हे लिंगायत समुदायातील नेते आहेत.

कर्नाटकच्या राजकारणात लिंगायत समाजानंतर दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या वोक्कालिगा समुदायातील नेत्यांचीही नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. यात अश्वथ नारायण आणि सीटी रवी यांची नावे येतात. त्यामुळे लिंगायतेतर समुदायातील मुख्यमंत्रीही कर्नाटकात बघायला मिळू शकतो अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणारे प्रल्हाद जोशी हे ब-ाह्मण समुदायातील नेते आहेत. त्यामुळे मतांच्या गणितात त्यांचे पारडे जड नसले तरी केंद्रीय नेतृत्वातील वजन लक्षात घेता त्यांनाही मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!