जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 ऑगस्ट रोजी ऑनलाईन होणार

जळगाव प्रतिनिधी

26 जुलै

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेद्वारे र्(ींळवशे उेपषशीरपलळपस) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरीकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेद्वारे (तळवशेउेपषशीरपलळपस) होणार आहे. ज्या नागरीकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी

आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!