डान्सबारमधील ’छमछम’ला अभय देणे भोवले; दोन पोलीस निरीक्षक निलंबीत तर सहाय्यक आयुक्तांची उचलबांडी
ठाणे प्रतिनिधी
20 जुलै
लॉकडाउनच्या काळात कडक निर्बंध असतानाही ठाण्यामध्ये बार सुरू असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी ठाण्यातील दोन पोलीस निरीक्षकांना निलंबीत करण्यात आले आहे. तर दोन सहायक आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले होते.
तपासणी करुन दिला जायचा बारमध्ये प्रवेश
ठाण्यातील तीन पेट्रोल पंप या परिसरात असलेला अँटिक पॅलेस तर ठाण्याच्या गडकरी रंगायतन जवळच असलेले आम-पाली, नटराज अशा लेडीज डान्स बारचे एका वाहिनीने स्टिंग ऑॅपरेशन केले होते. त्यानंतर या ठाण्यातील बारमध्ये ’छमछम’ असल्याचा गौप्यस्फोट झाला होता. बारचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवून ग-ाहकांना तपासणी करत आत सोडण्यात येत होते. यात पोलीस किंवा पत्रकार नसल्याची खात्री करून मागच्या दरवाजाने एन्ट्री देण्यात येत होती. लॉकडाऊनमध्येही हे डान्स बार जल्लोषात सुरू होते.
ठाण्यातील पेट्रोल पंप येथील अँटिक पॅलेस, गडकरी रंगायतन सर्कल जवळील आम-पाली नटराज हे बार लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करत सुरूच असल्याचे स्टिंग ऑॅपरेशनने समोर आले. त्यानंतर आता हे डान्सबार कुणाच्या संरक्षणात चालतात, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे या स्टिंग ऑॅपरेशनचा गौप्यस्फोट झाल्याने आता डान्स बार सुरू असलेल्या परिसरातील जबाबदार पोलीस अधिकार्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.