डबलिन एकदिवशीय : मलान आणि डि कॉकच्या कामगिरीने दक्षिण अफ्रिका विजयी
डबलिन
17जुलै
सलामीचा फलंदाज जानेमान मलान (नाबाद 177) आणि क्विंटन डी कॉक (120) यांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने येथील द विलेजमध्ये खेळण्यात आलेल्या मालिकेतील तिस-या आणि शेवटच्या सामन्यात आयरलँडला 70 धावाने पराभूत केले. दोनीही संघातील ही मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दक्षिण अफ्रिकेने मलानच्या 169 चेंडूत 16 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 177 धावा आणि डी कॉकच्या 91 चेंडूत 11 चौकार व पाच षटकारांच्या मदतीने 120 धावांच्या जोरावर 50 षटकात चार बाद 345 धावा केल्या. मलान व कॉकने पहिल्या गडयासाठी 226 धावांची भागेदारी केली. या व्यतिरीक्त रैसी वॉन डेर डुसैनने 30 धावा केल्या. आयरलँडकडून जोशुआ लिटलने दोन तर क्रॅग यंग तसेच सिमीने प्रत्येकी एक गडी बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना आयरलँडच्या संघाने सिमी सिंहच्या 91 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 100 धावांच्या व्यतिरीक्त 47.1 षटकात सर्वबाद 276 धावसंख्या केली. तसेच कर्टिस कैंफरने 54 आणि हॅरी टेक्टरने 29 धावा केल्या.
दक्षिण अफ्रिकेकडून आंदिले फेहलुकवायो आणि तबरेज शम्सीने प्रत्येकी तीन तर केशव महाराजने दोन आणि एनरिच नॉत्जे आणि लिजाड विलियम्सने प्रत्येकी एक गडी बाद केला.