ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील बनले सर्व सामान्याचा आधार…

दैनिक महाराष्ट्र सारथी सातारा प्रतिनिधी.

भादे जि.प.ग.नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी युवकांची एकमुखाने मागणी.

सातारा खंडाळा:हेमंत धायगुडे पाटील
खंडाळा तालुक्यातील गावागावात जाऊन मराठा-बहुजन-धनगर-मुस्लिम आरक्षणासह समाजाच्या विविध तळागाळातील घटकांतील एस.सी,एस.टी,ओ.बी.सी,एस.बी.सी,व्ही.जे.एन.टी प्रवर्गातील जनतेसाठी आरक्षणाच्या मुद्द्यावर शिक्षणात व नोकरीत आरक्षण तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जानजागृती करण्यात येत आहे.समाजामध्ये समता,बंधुता,एकता ही मूल्ये रूजवण्याचे कार्य खंडाळा तालुक्याचे सूपुत्र एकमेव माजी आमदार स्व.माधवराव धायगुडे पाटील तथा माजी सभापती पंचायत समिती खंडाळा,माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा स्व.अविनाशभाऊ माधवराव धायगुडे पाटील यांचे सुपुत्र खंडाळा तालुक्याचा बुलंद आवाज युथ आयकॉन तरूणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांनी संवाद बैठकीच्या माध्यमातून समाजात सुरू केले आहे.या उपक्रमांत ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटलांना जेष्ठांच्या कौतुकाची पाठीवर थाप व तरूणांचा प्रचंड उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.खंडाळा तालुक्यातील भादे जिल्हा परिषद गटात माजी सभापती पंचायत समिती खंडाळा व माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा स्व.अविनाशभाऊनी विकासाची गंगा प्रत्येक गावातल्या तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण आयुष्य अहोरात्र कार्यरत राहिले.त्यावेळी भादे जिल्हा परिषद गटात आनंदराव शेळके पाटलांनी साथ दिली.
वंचित,शोषित,पिडीत,गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचे अंधारमय जीवन प्रकाशमय करत असल्याने जनतेच्या मनात स्व.अविनाशभाऊ बद्दल निस्वार्थ प्रेम, माया,आपुलकी असल्याचे दिसून येते.आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून जनतेशी स्व.अविनाश धायगुडे पाटलांची नाळ जुळली होती. यशाच्या उंच शिखरावर असताना नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
स्व.अविनाशभाऊच्या अचानक अकाली निधनाने खंडाळा तालुक्यासह भादे जिल्हा परिषद गट पोरका झाल्याची लोकभावना जनमानसात निर्माण झाली.त्यामुळे तालुक्यासह भादे जिल्हा परिषद गटात पोकळी निर्माण झाली.सोबतच विकासाची गती मंदावली.त्यानंतर मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली जनतेची कामे पूर्ण करण्यासाठी जनतेला सदैव आपल्या सोबत असणार्‍या कृतिशील विचारांच्या संवेदनशील लोकप्रतिनिधीची नितांत गरज असल्याचे मत जनतेतून व्यक्त केले जात आहे.
मराठा-बहुजन-धनगर-मुस्लिम जागर अभियानाच्या माध्यमातून खंडाळा तालुक्यासह भादे जिल्हा परिषद गटात ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटलांनी जनतेशी संवाद साधत विचारांची नाळ जोडली. या जोडलेल्या नाळेतून अनेक जेष्ठ जूने जाणते वडीलधारी मार्गदर्शक मंडळींचा व युवकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद खंडाळा तालुक्याचे युवा नेते ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटलांना मिळत आहे.
त्यामुळे भविष्यात भादे जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व युवा नेते ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटलांनीच करावे अशी एक मुखाने मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

नव नेतृत्वाला सुवर्णसंधी
स्व.अविनाशभाऊंनी विकासाची गंगा घरोघरी पोहचवून जनतेला न्याय मिळवून दिला.स्व.अविनाशभाऊंच्या दुःखद निधनाने तालुक्याच्या गतिमान विकासाला खीळ बसली होती.परंतु ऋषिकेश आप्पांमध्ये अविनाशभाऊच्या विचारांचा वारसा लाभल्याने तरूणांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण झाल्यामुळे युवकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याने भादे जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटलांनी करावे अशी मागणी जनतेच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!