‘मैं जीता हूं मरने के लिए, मेरा नाम है सिपाही’; ’भुज: द प्राइड ऑफ इंडिया’चा दमदार ट्रेलर रिलीज

मुंबई प्रतिनिधी

12 जुलै

Bhuj: The Pride Of India Trailer Ajay Devgn And Sonakshi Sinha Starrer Film  | Bhuj: The Pride Of India Trailer : 'मैं जीता हूं मरने के लिए, मेरा नाम है  सिपाही'; 'भुज:

बॉलीवुड स्टार अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा यांचा आगामी चित्रपट ’भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने  हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याअगोदर डिस्ने  हॉटस्टारने नुकताच भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये थरारक घटनांचे सीक्वेन्स, भावनांच्या अनेक छटा, देशप्रेम आणि भुजमधील लोकांची एकता प्रतीत होत आहे. ट्रेलर सुरु झाल्यापासून संपेपर्यंत ट्रेलर पाहताना एकदाही कंटाळा आल्यासारखं वाटत नाही. ट्रेलरमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ट्रेलरमधील डायलॉग्स. प्रेक्षकांना खिळवूण ठेवण्यात सर्वात मोठी भूमिका हे डायलॉग्स बजावत आहेत. अशातच अजय देवगणला सैनिकाच्या भूमिकेत पाहूनही चाहते खूश झाले आहेत. तसेच संजय दत्त यांचीही भूमिका लक्ष वेधून घेते.

या चित्रपटात अनेक तरुणांची क्रश असलेली नोरा फतेही देखील दिसून येणार आहे. नोरा या चित्रपटात आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. जरी ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हाला फार कमी स्क्रिन स्पेस दिसत असली, तरी तिची भूमिका परिणामकारक असल्याचं दिसून येत आहे.

13 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार चित्रपट

यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ 13 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने  हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याअगोदर डिस्ने  हॉटस्टारने नुकताच भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे, ज्यात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय वायुसेनेचे आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्या पराक्रमावर प्रेरीत भुज चित्रपट आहे.

सत्य घटनेवर आधारीत

हा चित्रपट 1971 च्या सत्य घटनेवर आधारित आहे. जेव्हा पाकिस्तानने भारताच्या एअरबेसवर हल्ला केला होता. एअरबेसवर 92 बॉम्ब आणि 22 रॉकेटने हल्ला करण्यात आला होता. अशा परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या शूर अधिकार्‍याने आपल्या धैर्याने एअरबेस वाचवलाच. त्याचबरोबर स्थानिक ग-ामस्थांच्या मदतीने नवीन हवाई पट्टी रात्रीत तयार केली. विजय कर्णिक असे अधिकार्‍याचे नाव होते. अजय देवगण चित्रपटात तीच भूमिका साकारत आहेत.

सोनाक्षी गावची मुलगी तर नोरा दिसणार एजंटच्या भूमिकेत

या चित्रपटात प्रत्येक पात्राची भूमिका खूप रंजक आहे. विशेषत: सोनाक्षी सिन्हा आणि नोरा फतेही. नोरा या चित्रपटातून अभिनयाची कौशल्ये दाखवणार आहे, यात ती एजंटची भूमिका साकारणार असून कडक अ‍ॅक्शन करतानाही दिसणार आहे. दुसरीकडे, सोनाक्षी सिन्हा भुजमधील खेड्यातील एका मुलीच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर मोशन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही सांगण्यात आली आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी भुजला 13 ऑगस्ट रिलीज होणार आहे. आपण हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर पाहू शकता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!