वरणगाव ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू असतांना उडाला गोंधळ -पोलिसांच्या मध्यस्थीने लसीकरनाला सुरुवात.
✍🏻वरणगाव ता. भुसावळ दि०५ तारखेला दुपारच्या सत्रात लसीकरण सुरू असतांना गोंधळ होऊन उपस्थित नागरिकांची शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.
वरणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे हजर होताच जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली व जमावाला तेथून थेट पोलीस स्टेशन येथे नेत रांगेत बसून प्रत्येकाला लसीकरणाचे कूपन वाटप करून पुन्हा रुग्णालयात आणून प्रत्येकी व्यक्तीला आत सोडण्यात आले असून पोलिसांच्या मध्यस्थीने नागरिकांचे लसीकरण यशस्वी झाले.
भारत सरकारकडे योग्य अशा प्रमाणात लसीकरण याचा साठा उपलब्ध असून सर्व नागरिकांना लस ही मिळणार आहे तरी नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर स्टाफ व पोलिसांनी केलेले आहे
चोख बंदोबस्त ठेवणारे कॉन्स्टेबल रामचंद्र मोरे कमलाकर राजहंस दुसाने अतुल कुमावत गणेश माडी होमगार्ड गजानन चव्हाण महेश सोनार व सामाजिक कार्यकर्ते विशाल चौधरी भीमराव निकम यांनी सहकार्य केले.