अमळनेर येथे भुमिराज नागरी सहकारी पतपेढी मर्या. अंमळनेर या शाखेचे शुभारंभ उद्घाटन संपन्न.

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी शैलेंद्र ठाकूर यांचे कडून.

✍🏻 अमळनेर येथे दिनांक1 जुलै रोजी भुमिराज नागरी सहकारी पतपेढी मर्या. अंमळनेर .जिल्हा जळगाव या शाखेचे शुभारंभ उद्घाटन संपन्न झाले.
भुमिराज नागरी सहकारी पतपेढी उदघाटन मा. श्री. दिलीपजी वानखेडे (सेवानिवृत्त नायब तहसीलदार) यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण शाखेचे मॅनेजर श्री राहुल पवनकर व हस्तीं बँक चे मॅनेजर अनिल शिंपी. तसेच सामाजिक आपुलकी जोपासणारे मुन्ना शेख ( पत्रकार). श्री कैलास जाधव ॲड.तिलोत्तमा पाटील. ऑडिटर- मुबारक तडवी जळगाव तसेच महेश पाटील (कृष्णा बॅटरी) श्री प्रकाश वाघ (राजलक्ष्मी इंजिनीरिंग ) व शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मित्र परिवार.यांची उपस्थिती लाभली.

भूमिराज नागरी सहकारी पतपेढी च्या माध्यमातून खालील योजना लवकर सुरुवात करत असून काही योजना कार्य रत करण्यात आलेल्या आहे.

या मध्ये दैनिक सुलभ ठेव योजना. आर डी ठेव योजना. फिक्स डिपॉझिट योजना. पेन्शन योजना. मुदत ठेव योजना. महिला समृद्धी योजना. लखपती ठेव योजना. मुदतबंद ठेव योजना. वाहन कर्ज योजना. होम लोन योजना. अशा अनेक प्रकारच्या योजना भुमिराज नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

भूमिराज नागरी सहकारी पतपेढी च्या माध्यमातून आधार कार्ड वरून पैसे काढणे .पैसे बाहेरगावी पाठवणे. लाईट बिल भरणा करणे.एलआय सी प्रीमियम भरणा करणे. व्यवसाय करीता कर्ज सुविधा. अशा अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

सदर पतसंस्थेच्या माध्यमातून गरीब होतकरू व सुशिक्षित बेरोजगार युवकांना लहान-मोठ्या व्यवसायाकरिता कर्ज देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

भूमिराज नागरी सहकारी पतपेढी चे चेअरमन विजय ठाकूर हे असून. व्हॉइस चेअरमन श्री. संजय हिंदुजा हे आहेत.
संचालक मंडळामध्ये ॲड. श्री माधव बडगुजर. श्री राहुल पवार. श्री मुकुंदराव पाटील. श्री राजेश सोनार. डॉक्टर महेश पाटील. श्री संभाजी पाटील. सौ एम आर पाटील. सौ एस व्ही ठाकूर. तसेच श्री प्रसाद कुलकर्णी हे आहेत.


शोषित, पीडित, दलित, वंचितांचा बुलंद आवाज दैनिक “महाराष्ट्र सारथी”

 आम्ही दैनिक "महाराष्ट्र सारथी" व साप्ताहिक "अनमोल मत" या नावाने मराठी अंक सुरू केलेले आहेत.
  सदर अंक जळगाव,धुळे ,नंदुरबार, नाशिक, या ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येतो.
 आपल्याकडे आपण केलेले काही चांगले कार्य, लेख, कविता ,माहिती, आयुर्वेद, सौंदर्याविषयी,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्या विषयी जनजागृती करायची असल्यास आम्हाला खालील व्हाट्सअप नंबर वर माहिती पाठविल्यास आम्ही मोफत प्रसिद्धी देवु.
  सदर लेख पाठवताना टाईप करून (फोटो असल्यास) अवश्य  पाठवावे

आपला शुभचिंतक
शैलेंद्र विठ्ठल ठाकूर
कार्यकारी संपादक
जळगाव*
🪀9860085700

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!