आमदार देवेंद्र भुयार यांनी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरिता खेचून आणला कोट्यावधी रुपयांचा निधी !
चांदस वाठोडा दाभी प्रकल्पाकरीता १३६कोटी २३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर !
१६२३ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली.
१८१८ हेक्टर प्रकल्पाची सिंचन क्षमता .
१२.३७ दशलक्ष घन मिटत एकूण पाणीसाठा होणार तयार.
वरुड तालुका प्रतिनिधी:
वरुड मोर्शी तालुक्यातील अपूर्ण अवस्थेत असलेले संपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी नियामक मंडळाच्या २९/१२/२०१९ च्या ७९ व्या बैठकीमध्ये ठराव क्रमांक ७९/३२ घेऊन, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्यासोबत २९/१२/२०२० रोजी झालेल्या बैठकीमध्ये संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश देऊन दिनांक १३/१०/२०२० रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली मोर्शी विधानसभा मतदार संघातील मोर्शी व वरुड तालुक्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेणे, बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचवून सिंचनाची सोय उपलब्ध करणे, संत्रा पिकाची लागवड मोठया प्रमाणावर असल्यामुळे सिंचन प्रकल्पावर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे व सिंचन क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वरुड तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी चांदस वाठोडा ( दाभी प्रकल्प) प्रकल्पाच्या प्रस्तावित कामे पूर्ण करण्यासाठी महामंडळाचा निर्णय क्र २०/ विपाविम/ काता.4/ चांदस वाठोडा ल.पा.प्रकल्प/ दिनांक १७/०२/२०२१ रोजी चांदस वाठोडा दाभी प्रकल्पा करिता १३६ कोटी २३ लक्ष रुपयांच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून ३२ कोटी ९९ लक्ष रुपये कालवे व वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यासाठी प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रलंबित कामे पूर्णत्वास जाणार असून या प्रकल्पामुळे वरुड तालुक्यातील ९ गावातील १६२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचा फायदा वरुड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे . वरुड मोर्शी तालुक्यातील अपूर्ण प्रकल्पांची कामेही गतीने पूर्ण होतील, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
वरुड मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प असून मागील १० वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला असून त्यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. वरुड मोर्शी तालुक्यात सिंचन प्रकल्पाचा सुकाळ असून विकासाचा दुष्काळ असल्यामुळे सिंचन प्रकल्पांचे रखडलेले कामे व अपूर्ण आवस्थेत असलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी मंत्रालायमध्ये सतत बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा करून सर्वच सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे .
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत चांदस वाठोडा ल.पा. प्रकल्प (दाभी प्रकल्प) ता. वरुड जि.अमरावती,प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता किंमत १३६ कोटी २३ लक्ष रुपये किंमतीच्या प्रस्तावास नियामक मंडळाची मान्यता देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे केली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने “ विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत चांदस वाठोडा ल.पा. प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य यांच्या सिंचन अनुशेष कार्यक्रमांतर्गत असलेल्या प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता १३६ कोटी २३ लक्ष रुपये दंडकिंमतीच्या प्रस्तावास नियामक मंडळाची मान्यता देण्यात आली होती त्यानंतर १७/२/२०२१ रोजी चांदस वाठोडा दाभी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या माध्यमातून अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेणे, बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पुर्ण पाणी देवून सिंचनाची सोय उपलब्ध करणे, संत्रा पिकाची लागवड मोठया प्रमाणावर असल्यामुळे प्रकल्पावर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे व सिंचन क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ करण्यासाठी वितरण व्यवस्थेची कामे मार्गी लागणार असून यामध्यातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई निर्माण होणार असल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, महिला बाल कल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांचे आभार व्यक्त केले.
वरुड तालुक्यातील शेतकरी आणि जनसामांन्यांचे जीवन समृद्ध व्हावे आणि वरुड तालुक्याला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून वरुड मोर्शी तालुका समृद्ध करण्यासाठी तात्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी दूरदृष्टी ठेऊन मोर्शी वरुड तालुक्यात विविध सिंचन प्रकल्प तयार करून पाण्याची पातळी वाढल्यामुळे संत्रा बागांचे प्रणाम वाढल्यामुळे विक्रमी संत्रा उत्पादनामुळे मोर्शी वरुड तालुक्याला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख निर्माण झाली. वरुड मोर्शी तालुका सुजलाम सुफलाम करणे हा दृष्टिकोन लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील अपूर्ण असेलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन मोर्शी वरुड तालुका दुष्काळमुक्त करून शेतकऱ्यांना समृद्ध करणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली .
प्रतिक्रिया —
श्रेयाच्या लढाईच्या भानगडीत न पडता विरोधकांच्या टिकेस उत्तर न देता प्रत्यक्ष कामाला महत्व देऊन ते काम पूर्णत्वास नेण्याचे काम मला करायचे आहे. विरोधकांच्या प्रश्नाला मी उत्तर देत बसलो तर मतदार संघाचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. मतदार संघातील रखडलेली विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी असल्याचे विरोधक सांगतात मात्र तेच काम मंजूर करून आणल्यानंतर ते काम आम्हीच मंजूर करून आणल्याचे श्रेय घेऊन आपली पाठ थोपाडून घेत आहे. वरुड मोर्शी तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याकरीता मतदार संघातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.मतदार संघामध्ये सिंचनाच्या सोई निर्माण करून, अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, सिंचन प्रकल्पातून बंदिस्त पाईप लाईन द्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी उपलब्ध करून देणे, हाच माझा अजेंडा असून ही सर्व कामे ५ वर्षामध्ये पूर्ण करणार असून केलेल्या कामांचे ब्यानर लावणे, ढोल ताशे वाजविणे फटाके फोडणे, प्रसिद्धी मिळविणे हा माझा स्वभाव नसून जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी ठरवणार असून जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा उद्देश आहे — देवेंद्र भुयार आमदार मोर्शी विधानसभा