वटसावित्री पौर्णिमा निमित्त -निसर्ग पर्यावरण सखीमंच महाराष्ट्र व जळगाव जनता सहकारी बँक बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..
दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी दीपक दाभाडे
जळगाव शहरातील देवेंद्र नगर व कोठारी नगर येथे निसर्ग पर्यावरण सखीमंच महाराष्ट्र व जळगाव जनता सहकारी बँक बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने वडाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले..
100 वर्ष ऑक्सिजन देणारे झाड म्हणजे वड म्हणून वडाचे फांद्या तोडून पुजा करण्यापेक्षा पुढच्या पिढी साठी वडाचे रोप लावून जगवण्याचा सर्व महिला भगिनींनी संकल्प केला. वृक्षरोपण प्रसंगी आई सोबत मुलांनी देखील वडाचे रोप लावून वड जगवण्याचा संकल्प केला.
वड,पिंपळ, औदुंबर, कडुलिंब, शिसम, करंज ,सारखे वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्षा सौ. मनीषा पाटील ,सचिव सुचिता पाटील, शहराध्यक्ष नेहा जगताप, दीपाली कुलकर्णी ,सुलभा बाविस्कर , नगरसेविका सुरेखा ताई तायडे, सोनल नाईक, डॉ. सुरेखा महाजन, अर्चना पाटील ,तसेच बचत गटातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या
वड,पिंपळ,औधुम्बर, कडुलिंब शिसम करंज सारखे वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.