पारोळ्यात एकाच रात्री चार घरफोड्या – दीड लाखाचा ऐवज लंपास

पारोळा प्रतिनिधी –

शिव कॉलनी परिसरातील महिला आपल्या काकांच्या अंत्यविधीसाठी गेले असता त्यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये लंपास केले तर अन्य तीन ठिकाणी ही घरफोडी केल्याची घटना घडली.
पारोळा शहरातील शिव कॉलनी परिसरात राहत असलेले सैन्य दलातील जवानाच्या पत्नी अश्विनी यशवंत पाटील हे दि १८ रोजी आपल्या काकांचा अंत्यविधी कार्यक्रमासाठी बाहेरगावी मुक्कामी घराला कुलूप लावून मुलांसह गेले होते.त्यांच्या बंद घराचा फायदा उचलत मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोंडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने त्यात चैन,अंगठी चांदीच्या वस्तू सह रोकड असे सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला.चोरटे एवढ्यावरच न थांबता आजूबाजूला राहत असलेले प्रभाकर रूपा राठोड, रुखमाबाई गोपाल महाजन, जोरसिंग मंगतू पवार यांचे देखील बंद घराचे कुलूप तोडून घरातील काही रोख रुपये इतर वस्तू चोरून नेल्याचे समजते.मात्र ही मंडळी बाहेरगावी असल्याने किती रक्कम चोरीला गेली आहे हे अद्याप कळू शकले नाही.याबाबत पारोळा पोलिसात आज अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी झाल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे.पोलिसांनी गस्त वाढ करून चोरट्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!