उत्तर विभागीय वादविवाद स्पर्धेत शितल अकॅडमी ला सुयश..
पारोळा प्रतिनिधी –
उत्तर महाराष्ट्र विभागातील,विविध अकॅडमी च्या माध्यमातून दिनांक २ रोजी रविवारी शहादा येथे जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. त्यात पारोळा येथील शितल अकॅडमी चा विद्यार्थी संघ विजय घोषित करण्यात आला.
याबाबत सविस्तर असे की, उत्तर महाराष्ट्र विभागात विविध अकॅडमी च्या माध्यमातून,दरवर्षी विविध स्वरूपाचे वादविवाद इंग्लिश डिबेट स्पर्धा घेण्यात येतात.त्या अनुषंगाने या स्वरूपाची वादविवाद इंग्लिश डिबेट स्पर्धा शहादा येथे यावर्षी घेण्यात आली.या स्पर्धेत एकूण ९ विद्यार्थी सहभागी झाले होते.ह्या स्पर्धेसाठी प्रमूख पाहुणे म्हणून न्यायाधीश शिवानंद दुठादे (प्राध्यापक सीनिअर कॉलेज, भामखेडा),अध्यक्ष समाधान पाटील (तळोदा शाखा) शहादा अकॅडमी चे संचालक सागर शेंडे व योगेश शेंडे यांचेसह पारोळा शितल अकॅडमीचे संचालक रविंद्र पाटील,शितल अकॅडमी चे मुख्याध्यापक मंगेश पवार तसेच दिपाली शिंपी,गायत्री ठाकरे, राजश्री वाघ,प्रतीक्षा पाटील,रुपल सोनार,दीपांजली पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना संबोधत देह बोली व आत्मविश्वास या विषयी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.रोहित नामदेव माळी,प्रज्वल पाटील यांना चांगला वक्ता म्हणून ट्रॉफी व मेडल देण्यात आले.तद्नंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.