अल्पसंख्यांक वस्तीचा विकासकामांना ७५ लाखांचा निधी मंजुर….
पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )
एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक वस्त्यांचा विकासकामांसाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतून ७५ लाखांचा निधी मंजुर झाला आहे.गेल्या अनेक वर्षांपासुन या वस्त्यांमध्ये मुलभुत सुविधेसह अनेक समस्यांना दैनंदिन सामोरे जावे लागत होते. वस्त्यांचा देखील विकास व्हावा यासाठी मुस्लिम बांधवांकडुन मोठी मागणी होत असल्याने आ. चिमणराव पाटील हे वेळोवेळी पाठपुरावा करित होते. मतदारसंघातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा दुरदृष्टीने व सततच्या पाठपुराव्याने आज शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत ७५ लक्ष रूपयांचा विकासकामांना मंजुरी प्राप्त झाली आहे.यात एरंडोल तालुक्यातील उत्राण गुजर हद्द कासोदा,भडगांव तालुक्यातील पिंपरखेड,गिरड व पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे मुस्लिम समाजासाठी शादीखाना बांधकामी प्रत्येकी १५ लक्ष प्रमाणे ७५ लक्ष रूपयांचा कामांना मंजुरी देण्यात आली आहे.यामुळे मुस्लिम समाजाचे लहान-मोठे कार्यक्रम पुर्ण होणेसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. निधी मंजुर केल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.