शिरपूर तालुक्यातील संगांयो व इंगांयो योजनांचे लाभार्थी यांनी हयाती दाखले सादर करावे….
शिरपूर तहसीलदार आबा महाजन यांचे आवाहन.
शिरपूर ग्रामीण प्रतिनिधी – ( ज्ञानेश्वर सैंदाणे )
शिरपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार,श्रावणबाळ योजना,इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी दिव्यांग व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनांचे लाभार्थी यांनी हयाती दाखला स्विकारण्याचे कामकाज तहसिल कार्यालयात सुरू आहे,तरी वरील योजनेतील लाभार्थींनी स्वता समक्ष हजर राहून नविन प्रशासकिय इमारत तहसिल कार्यालय,शिरपूर येते हयाती दाखले सादर करावेत,तसेच शिरपूर तालुक्यातील ग्रामिण भागातील लाभार्थींनी आपल्या गावातील तलाठी कार्यालयात तलाठी यांच्या जवळ स्वता हजर राहून हयातीचे दाखले सादर करावेत . हयाती दाखल्या सोबत विहीत नमुन्यातील हयातीचे प्रमाणपत्रावर लाभार्थीची स्वाक्षरी तसेच लाभार्थीचे आधार कार्ड व बॅक पासबुक ची छायाकिंत प्रत सादर करणे आवश्यक आहे.तरी सदरचे हयातीचे दाखले सादर करण्याची अंतिम मुदत हि 31 मार्च 2023 पर्यत राहील याची सर्व लाभार्थींनी नोंद घ्यावी.असे आवहान तहसिलदार शिरपूर,श्री.आबा महाजन यांनी केलेले आहे.