समता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी हेमेंद्र सपकाळे

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव च्या वतीने जिल्हा मेळाव्याचे आयोजन..

जळगाव-जिल्हा निमंत्रक रणजीत सोनवणे व त्यांच्या समवेत मनीषा देशमुख मनोज नन्नवरे या तिघ जिल्हा निमंत्रकांच्या नेतृत्वाखाली 14 नोव्हेंबर रविवारी जळगाव येथे करण्यात आले. याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, विस्तारअधिकारी रागिनी चव्हाण व शिक्षण विस्ताराधिकारी खलील शेख, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे समता परिषदेचे राज्य प्रदेशाध्यक्ष आप्पासो भरतजी शिरसाठ प्राथमिक विभागाचे माजी राज्य अध्यक्ष सूर्यकांतजी गरुड राज्य सदस्य डी.एम.मोतीराय,कास्ट्राईबाचे विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, माजी विभागीय राज्य अध्यक्ष रावसाहेब जगताप,मा.अध्यक्ष बी.एन.पाटील महिला विभागाच्या जिल्हाअध्यक्षा छाया बैसाने,भैय्यासाहेब सोनवणे,यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभ भाई पटेल सभागृह जळगाव येथे शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या उपस्थित बाबडू सुपडू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा संस्थाचालक हेमहेंद्र सपकाळे यांची समता शिक्षक परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!