महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन जळगाव यांच्या वतीने योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी

जळगांव :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन जळगाव यांच्यावतीने जागतिक योगदिनानिमित्त जीवनातील योगाचे महत्व यावर प्रात्याक्षिकासह ऑन लाईन व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणून विश्वमंगल नॅचरोथेरपी सेंटरच्या कविता अतुल चौधरी यांनी ऑन लाईन प्रात्याक्षिकासह आयोगाचे महत्व यावर सविस्तर व्याख्यान दिले
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयसिंग परदेशी होते तर पाहुणे म्हणून शशिकांत पाटील , मिलिंद पाटील, किशोर पाटील होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्र संचालक नरेश पाटील यांनी केले.

लाईफ इन्शुरन्स आणि MWP Act 1874
स्वतः च्या आयुष्या वरील जीवन विमा पॉलिसी घेतांना मुख्य उद्देश आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा हाच असतो. पॉलिसी कालावधी मध्ये विमेदराचा मृत्यु झाला तर मृत्यु दावा नामित व्यक्तीस अथवा कायदेशीर वारस दारास दिला जातो. नामित व्यक्ती बहुतांशी पत्नी किंवा मुले च असतात पण मृत्यु दाव्याच्या रकमेवर इतर कायदेशीर वारसदार अथवा विमेदाराचे कर्ज दाते सुद्धा हक्क सांगु शकतात .अशा वेळी ज्या उद्देशाने पॉलिसी घेतली तो सफल होत नाही आणि कर्त्याच्या निधनाने कुटुंब अडचणीत येते.
विवाहित स्त्री संपत्ती कायदा ( Married Women’s Property Act) 1874 विवाहीत स्त्रियां च्या संपत्तीचे इतरांपासून स्वतः च्या पती पासून सुध्दा रक्षण करण्यासाठी 1874 मध्ये कायदा केला गेला. ह्या कायद्याच्या सेक्शन मध्ये जीवन विमा पॉलिसी चा अंतर्भाव केलेला आहे.
स्वतः च्या आयुष्या वरील जीवन विमा पॉलिसी MWP अॅक्ट अंतर्गत घेतली तर ती पॉलिसी न्यास (ट्रस्ट) मध्ये रुपांतरीत होते व त्यावर फक्तं नामित व्यक्तीचाच हक्क राहतो व दावाही नामित व्यक्तीलाच मिळतो.
MWP Act अंतर्गत कोण घेऊ शकतो विमा पॉलिसी?
कुणीही विवाहीत भारतीय पुरुष MWP कायद्या अंतर्गत पॉलिसी घेऊ शकतो पण लाभार्थी हे पत्नी किंवा मुले असले पाहिजे.तो divorced किंवा विधुर असला तरी चालेल.
विधवा किंवा विवाहीत भारतीय स्त्री सुध्दा स्वतः ची विमा पॉलिसी मुलांच्या लाभा साठी (nominee) घेऊ शकते.
MWP कायद्या अंतर्गत पॉलिसी सर्व धर्माच्या विवाहीत स्त्री पुरुषांना (भारतीय) घेता येते.
सर्व प्रकारच्या पॉलिसी – Endowment/टर्म/मनी बॅक/युलीप या MWP Act अंतर्गत घेता येऊ शकतात.
ह्या कायद्याच्या अंतर्गत पॉलिसी केवळ NB Stage ला घेता येते. आधी घेतलेली पॉलिसी MWP ऍक्ट अंतर्गत परावर्तीत करता येत नाहीत.
MWP कायद्याच्या अंतर्गत पॉलिसी घेण्याची प्रक्रिया:
MWP ऍक्ट चे Addendum नविन प्रपोजल सोबत भरून द्यावे लागते. ज्यात नामीत व्यक्ती पत्नी किंवा मुले अथवा दोन्हींचा उल्लेख करावा लागतो. नामित व्यक्तीं ची पॉलिसी लाभातील हिस्सेदारी सुद्धा नमुद करता येते. नामित व्यक्तीसाठी त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्था यांची न्यास (ट्रस्ट) म्हणुन नियुक्ती करता येते.
विमा पॉलिसी हे दीर्घ मुदतीचे करार असतात त्यातील लाभार्थी डिव्होर्स किंवा मृत्यु मुळे बदलले असतील तर तसे बदल नंतर करता येतात.
पॉलिसी MWP ऍक्ट अंतर्गत घेतल्या नंतर दुसरीकडे Assign करता येत नाही.
पॉलिसी वर लोन किंवा सरेंडर साठी ट्रस्टी व नामित् व्यक्ती (सज्ञान) ची स्वाक्षरी आवश्यक असते.
सारांश: विवाहीत स्त्री संपत्ती कायदा १८७४ (MWP ऍक्ट) मधील सेक्शन ६ मुळे लाभार्थी (नॉमिनी) चे अधिक संरक्षण होत असल्या मुळे पॉलिसी MWP ऍक्ट अंतर्गत घेतल्या पाहिजेत.
पण केवळ विमा क्षेत्रात या संबंधी माहिती च्या अभावा मुळे पॉलिसी या कायद्या अंतर्गत खरेदी केल्या जात नाहीत. वास्तविक ह्यात कुठलाही ज्यादा आकार ही द्यावा लागत नाही.
संपर्क
देवेंद्र भावसार
९४२०३८३८३७/८७९३५६७६७२
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!