ठोकळवाडी येथे दिवाळीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..
इगतपुरी प्रतिनिधी – ( त्र्यंबक जाधव mob.- 7588038986 )
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत मायदरा-धानोशी येथील ठोकळवाडीतील शालेय विद्यार्थ्यांना प्रवरा वेल्फेअर असोसिएशन नाशिक या सामाजिक संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्ताने दिवाळी लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
शालेय साहित्य वाटप प्रसंगी ठोकळवाडीतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होतांना पहायला मिळाला.शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची दिवाळी भेट प्रवरा वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक संस्थेकडून पहिल्यांदाच वर्धापनदिनानिमित्त देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप होताच ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले.याप्रसंगी मायदरा-धानोशी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुनील ठोकळ,ग्रामपंचायत सदस्य गंगाराम करवंदे,कृषिसहाय्यक सोमनाथ ठोकळ,शिक्षक राजेंद्र मुंढे, माजी सैनिक भोरू ठोकळ आदींसह गावकरी उपस्थित होते तर सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विजय ठोकळ,जालिंदर करवंदे, दत्तात्रय करवंदे,पोपट करवंदे,नारायण करवंदे, मोहन भांगे आदींनी परिश्रम घेतले.
या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थ्यांसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.