रावेर नगरपालिका ही ठराविक लोकाची का ? तुम्ही पण हिमंत ठेवा?
रावेर शहर प्रतिनिधी –
रावेर नगरपालिका मला आठवतय तेव्हापासून ठराविक लोकांच्या कब्जातच आहे रावेरकरांनी जणु यांना ठेका दिला आहे दर पंचवार्षिक मध्ये का? आपण जाणकार मतदार हेच फक्त आपला नातेवाईक, मित्र , ओळख आहे म्हणुन त्यांना एक प्रकारे बापानंतर मुलगा ,सुन , लहान भाऊ .असा ठेकाच . दिला . आहे आपण सर्वानी मिळून यांना निवडून देवुन त्यांच्या भष्टाचारात आपण पण कळत नकळत दोषी आहेत मतदान केले. याचा अर्थ आपली सर्वाची जवाबदारी संपली का? जाब विचारण्याची हिमंत असु द्या . नगर सेवक दादा आपण ह्या भागात कधी रस्ता ‘गटरी , पथदिवे व पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करणार आहे पण हिमंत करतो कोण फासावर चढविले तर त्या शेठ , दादा , भाई , भाऊ , वकील, डॉक्टर व ठेकेदाराने तर वादा होईल ना म्हणुन कोणीही पुढे येत नाही आला तर त्याला सोयीस्कर रित्या दवाब आणुन शांत केला जातो हे कुठपर्यन्न चालणार हे येथआणि आता बस्स झाल
तुम्ही आपण दादा भाऊ काका शेठ भाई म्हणून त्यांना अर्ज देतो विनंती करतो.त्यांना त्यांच्या सामाजिक कामातुनच वेळ नाही आपली गरजच नाही ह्या महाशयानां
भेटले तर हात जोडतात चहा पाणी घ्या गावाच्या समस्या बघण्यासाठी मुळातच निवडूण आलोय हे ते विसरले आपले पोट भरण्यासाठीच त्यांनी दोन तीन महीने ढाबे, हॉटेल उधळे घेतले होते पैशे पण वाटलेत बऱ्याच मतदार यांना व काही नां मोठे आश्वासन दिले पुढच्या वेळेस तुम्ही खायचे आम्हाला आता खाऊ दया पण पाच वर्षानंतर तेच उभे राहतात विकास हा त्यांचाच होतो ठेकेदार पण तेच नगरसेवक पण तेच ही पद्धत कधी बदलणार आमची कधी होईल जागा मतदार राजा हे रावेर साठी चिंतनीय बाब आहे दुदैव म्हणावे लागेल तुमची लढाईची इच्छा असेल तर कोठे लढणार साकळीच पुर्ण बरबटली आहे तर दाद मागणार कोणाजवळ
तुमचे काही स्पेशल काम असेल तर सांगा करु म्हणजे एक प्रकारे लाच दिली जाते
नाटक ,टालमटोल व वेळेवर एखादया धमकी पण दिली जाते असे किती दिवस चालू द्यायची ह्या ठेकेदाराचे अशी पद्धत सागा?का खपवून घ्यायची? जीवनभर पुढच्या पिढीला पण ह्याच गोतावळ्यात ठेवायच का? आम्ही विचार करा
नगरपालिका असो कि कृषी उत्पन्न बाजार समीती, असो यांनीच मनमानी करावी का?. आज अशे कितीतरी राजकिय गुंड रावेर तालुक्यात फीरत आहेत फक्त आपल्या पोट भरण्यासाठी की समाज सेवा करण्यासाठी हा प्रश्न जन सामान्य व्यक्तीला पडत नाही काहो रावेर नगर पालीकेत असो की बाजार समितीत किंवा शैक्षणिक संस्थेत गाळे हे जवळपास यांचे, त्यांच्या नातेवाईक व जवळील कार्यकर्ते यांचे ठेकेपण .यांचे च. दोन चार अपवाद सोडले तर एखादा आमच्या सारखा बोलला तर त्यांला योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची हिमंत असतेच ह्या राजकिय गुंडाची पैसे घे . मुकाट्याने नाहीतर तोंड .बंद करू आमच्या पद्धतीने हा दम दिला जातो . ह्याच साठी आपण यांना निवडूण दिले का?
यासाठी रावेर तालुक्यातुन मतदान करतो का? आपण ह्या नेत्यांना जातीय वाद घालुन निवडूण येणारे हे महाशय आपले तिजोऱ्या भरतात फक्त शेत ,बँक बॅलेन्स ,’पॉपर्टी मोठे ठेकेदार यांची पाच वर्षातील उत्पन्न तपासा जरा सुज्ञ नागरिकानों झोपु नका माय बापानो नाहीतर एकदिवस तुमचे पाच वर्षात चार वेळेस रस्ता झालेला आहे हे कागद पत्री दाखवुन देण्यात मागे पुढे पाहणार नाहीत हे महाभाग उठा जागी व्हा मतदार राजा पाचशे – सातशे रुपयात विकतो आपण आपले मत की नाही सांगा तुमच्या कडे कधी येतात
,एकदा कि तुम्ही आपण यांना मतदान केले आणि यांचेकडे सत्ता सोपवली तर तुमची हिमंतच होत नाही कोणते कामे सांगायला जणु काही हे नगरसेवक खिशातले पैशे देवुन रावेरचा विकास करीत आहे ह्या तोऱ्यात जणु काही फिरत असतात तुम्ही आपण बोलणारे गुन्हेगार? पैसे ते मागतात,खंडणी ते मागतात ठेके ते घेतात बोलले तर . आम्हीच दोषी आणि आपण विरोध करणारे आहेच कोण यांना चोर आपण ते शावं हे रावेर भागात सुरु आहे हे सर्रास सुरु आहे
आपण गुन्हेगार कारण आपण यांच्या भष्टाचारवर लिहतो बोलतो मग डोळ्यात येणार कोण आपण ना? याला जवाबदार कोणाला मानाव मतदार राजाला की ह्या ठेकेदारांना हा प्रश्न सध्या सतावित आहे आज सत्तेत तेच राहणार उद्या पण त्यांनाच आणायच आहे का? रावेर तालुक्यातील मतदाराना विचार करा माइया सारखे बरेच आहेत पण का येत नाही हा प्रश्न पडतो नेहमी सुज्ञ असे हुशार मी तर शुन्य आहेत असे आहेत काही नागरिक यांनी पुढे येण्याची आज गरज आहे एक लहान भाऊ सोबत झेंडा घ्या विकासाचा हाती टाका भष्टाचारी यांच्या विरोधात
बदल घडेल पण संघटीत व्हाल तेव्हाच ! नाहीतर शक्य नाही अजुन हे निवडूण आल्यास माजुन उठणार हे तर नक्कीच आता १०० रुपयात ५० खात आहे भविष्यात ७५ रूपये खायला नाही म्हणार नाही हे आतापर्यंत झाले आता होवु नये
याला सत्तेचा माज उतरवायचा असेल तर पर्याय उभा करावाच लागेल जातीजातीत न राहता हिंन्दू मुस्लिम यांनी विकास करण्यासाठी जवळ येणे गरजेचे होय भष्टाचारी शत्रु हा कोणत्याच जातीचा नसतो फक्त असतो तो भष्टाचारी समाजाचा असतो ही किड काढणी आज गरजेची होय
आम्हाला हवे स्वच्छ प्रतिमेचे . नगर सेवक ठेकेदार नको रावेर मध्ये धर्मात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजणारे हे ढोंगी यांना बाजुला सारण्याची आज गरज निर्माण झालीय आज दोन्ही धर्मातील लोकांनी पुढे येण्याची गरज आहे आता नाही तर शक्यच नाही यांची
मनमानी कुठपर्यंत सहन करणार आपण सर्व सांगा
तुमची जाब विचारण्याची हिमंत आहे का ह्या माज चढलेल्या नगरसेवकांना
आणि ह्याचा माज उतरविण्यासाठी आपण पुढे येणे गरजेचे आहे नगरपालिका निवडणूकीत. बाजार समीती निवडणुकीत किंवा इतर स्वराज संस्थांच्या निवडणुकीत
आपण यांनाच सत्ता देणार का? परत तेच हुकुमशाही गटरी साफ करण्यासाठी दिवे लावण्या साठी आपल्या भागात सफाई करण्यासाठी व इतर विकास कामे करण्यासाठी यांचे हातपाय जोडणार का? पाचशे रुपये परत मतदान विकणार का आपले असे करण्यापेक्षा आपणच का नगरपालिकेची एक संघटन शक्ती बनत नाहीत नागरिक मतदार राजा यांना समजवुन सांगीतल्यास बदल नक्की घडेल यात शंका नाही
तुम्ही जाणते मतदार व्हा नागरिक व्हा प्रबोधन करा . विकासाचा व बदलाचा झेंडा तुमच्या हाती घ्या झेंडा मतदाराचा फडकवा विकासाचा फडकवा येणाऱ्या नगर पालीकेच्या निवडणुकीत होईल शक्य जिद्द हवी बदलाची
तुम्ही किती भष्टाचार करतात विचार केला का भ्रष्टाचाराच्या सोबत राहणे समर्थन करणे सुद्धा धर्मात पाप आहे नाही का? असे कुठपर्यत्न सहन करणार परिवारवाद , ठेकेदारी एकच नगरसेवक चार चार वेळेस बदल हवा तर विकास होईल
मत कुठ पर्यन्न विकणार आपले ? देशाचा संविधानाचा अपमान नाही का वाटत आपल्याला हा?
आता तरी तुम्ही जागे व्हा . नगरपालिकेत जाऊन तर बघा जाब तर विचारून बघा यांना जिद्द ठेवा ! कशात आपण कमी आहेत संविधानाने अधिकार दिला आहे अशिक्षित व्यक्ती नगर सेवक, नगराध्यक्ष होतात व शिक्षीत व्यक्ती .त्यांच्या सहया घ्यायला मागे फिरतो हे संविधानामुळे शक्य आहे पण त्या .व्यक्तीना विकासाची समज देणे गरज होय विकास करायाचा असेल तरच खुर्चीवर बसा नाहीतर खुर्ची सोडा नवीन तरुण यांना संधी दया ही विनंती रावेर मतदार नागरिक सुज्ञ व्हा जाणकार व्हा ! बुद्धीचा वापर करा ,ज्ञानाचा वापर करा
पैसा हाच सर्वस्व मानु नका जीवनात आपल्या थोडा रावेरचा पण विचार करा
फक्त पैसा कमी आहे.त्यासाठी चोरी,लांचखोरी, हप्तेखोरी,खंडणी वसुली करावी लागते.तसे केले तर आपण जनतेशी किती प्रामाणिक आहे हे दिसते अंतरमनात नाही का?
म्हणून आपण प्रामाणिक लोकांनी पुढे यावेआता प
रावेर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश करायचा असेल तर !
पैसा नसला तरी हरकत नाही. हिमंत दाखवा काही तरुणांनी मागच्या वेळेस थोडीफार हिमंत दाखविली ह्या लोकाविरोधात पण कमी पडले आता बदल घडू शकतो बरेच मतदार पैसा घेत नाही आणि आता बरेच मागणार नाही. असा कल रावेर मध्ये दिसत आहे त्यांना जागृत करणे फक्त आहे ती फक्त आम्हा तुमच्या सारख्यानी तोपर्यंत बदल अशक्य आहे लोक कंटाळली आहेत पण आधी पुढे येणार कोण हा मोठा प्रश्न बऱ्याच नागरिकांना असतो ज्याला पुढे पाठवितो तो जास्त भष्टाचाराची घाण करून ठेवतो पटतय ना भष्टाचारी चोर,लुटारूं ठेकेदार गुंड हे नगर पालिकेत नको असं प्रामाणिक कर धारकांना वाटत तुम्ही कर देता ना नगर पालीकेचा मंग घाबरता का? ह्या गुडांना यांना मतदान अजिबात करू नका कितीही आमीष दिले तरी
म्हणून तुमची, नगर पालीका ही प्रामाणिक स्वच्छ प्रतिमेच्या लोकांची वाट पाहात आहे. आजही पण आपण कमी पडतो प्रयत्न करतच नाही प्रतिकारही करत नाही बरेच मतदार फुकट मतदान करतील फक्त आपण प्रामाणिक राहावे लागेल त्यांच्याशी अस मला वाटते रावेर नगरपालिका ही आधी पासुन अशी भष्टाचारी होती का? काय काय उपाधी दिली गेली माजी नगराध्यक्ष यांना आपल्या मागील पिढीने आठवतेय का? .कोणीही पुढे यावे आम्ही सोबतीला आहोतच .काम हे नागरिकाचे होणे गरजेचे होय नगरसेवकाने दुधात पाणी टाकावे पण किती ? याची सुद्धा मर्यादा हवी शेताचे कुंपणच तुम्ही खावुन जाणार तर शेतामध्ये गुरेढोरे घुसणारच ना नगरपालिका कशी हवी आहे. विचार करा
अशी हिंमत इमानदार असणाऱ्या लोकांना आम्ही एकत्रित संघटीत व करीत आहोत.ज्यांना राजकीय पक्षांनी वापरले, व काम झाले सोडून दिले त्यांचा अनुभवाचा फायदा आम्हाला मिळणार आहेच आगामी काळात मार्गदर्शक म्हणून, किंवा ते स्वतः उमेदवार बनुन २१ होत की २५ नगरसेवक ह्या वेळेस जिद्द ठेवणारच निवडूण आणण्याचा प्रयत्नही करू काही संपर्कही करीत आहेत काही लोक फोन करून प्रोत्साहन पण देत आहेत तर काही गंमती पण घेत आहे असो सर्व आपले मनासारखे शक्य नसते आपणच योग्य आहे अस नाही ना पण ह्या वेळ काहीतरी ओळख इमानदारी ची नगरपालीकेत किंवा इतर ठिकाणी बनवु हे नक्की मतदारांना पटेल हे आगामी काही दिवसातच यात शंका नाही योग्य उमेदवारानी पुढे यावे हाच हेतु होय
उमेदवारी देण त्यांनी घेण ठाम राहणं हे शेवटी काळच सांगेल पण जे करणार रावेर विकास , बदल, ठेकेदारी, वारसदारी हे बदलवणार हे नक्की यासाठी करणार मेहनत हवी आपली मदत करीत करु एक अनोखा प्रयोग आज तरी रावेर एकीकरण समीती म्हणून बघु अजुन काय घडते पुढे
आता तरी बदल घडवा सांभाळा तुम्हीच . बना नगर सेवक बना पण प्रामाणिक नगरपालिका होवु द्या गतिमान
मी रावेर एकीकरणा समीती रावेर म्हणुन छोटस रोपट लावत आहे रावेर मध्ये आता आपण सुज्ञ मतदार किंवा योग्य उमेदवार यांनी पुढे येवुन आगामी काळात रोपट्याचं वृक्ष बनवायच का की भष्टाचाराचे कीड राहू द्यायची हे आपणच ठरवाव आपणास आवाहन करीत आहोत.या सोबत .लढा उमेदवार व्हा.जिका नाहीतर आपली ओळख निर्माण तर आगामी काळात दिसेलच यांत शका नाही.
ईश्वर रामदास महाजन
एकीकरण समीती रावेर