रोहित, विराट नव्हे; पाहा कोणाचा पायगुण ठरला भारताच्या पराभवाचं कारण

मुंबई,

टी -20 वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेटस राखून पराभव केला. दुबईत रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघ 7 विकेटवर 151 धावाच करू शकला. पाकिस्तानने निर्धारित लक्ष्य 18 ओव्हर्समध्ये एकंही विकेट न गमावता गाठलं. हे विजयाने पाकिस्तानने नवा इतिहास रचला. या पराभवाला अनेकांना जबाबदार धरलं जातंय. चाहत्यांनी मात्र या पराभवाला अक्षय कुमारला जबाबदार धरल्याचं दिसतंय.

दुबईत झालेला हा सामना पाहण्यासाठी लाखो लोक स्टेडियमवर पोहोचले होते. भारताच्या विजयाचा साक्षीदार होण्यासाठी अक्षय कुमारही दुबईला गेला होता. पण सामन्यात बाजी पलटली आणि पाकिस्तानने सामना जिंकला. पाकिस्तानने भारतावर 10 विकेटसने मात केली. त्यानंतर फॅन्सने अक्षय कुमारला टिवटरवर ट्रोल करायला सुरुवात केली.

युजर्सनी अक्षय कुमारचा स्टेडियममधला फोटो शेअर करत त्याला बरंच काही सुनावलं आहे. यातील अनेक फोटोंमध्ये अक्षय हसतानाही दिसतोय. यावेळी एका युजरने लिहिलंय- ’जेव्हा भारत हरत होता आणि ही व्यक्ती हसत होती. मी त्याला पहिल्यांदा स्टेडियममध्ये पाहिलं आणि भारत हरला.

तर एका यूजरने अक्षयचा फोटो एडिट करून त्याच्यावर पाकिस्तानी टी-शर्ट लावला आणि लिहिलंय – ’सर्वात आनंदी व्यक्ती.’ इतकंत नाही एका युजरने स्टेडियममधून अक्षयच्या फोटोचा फोटो शेअर केला आणि लिहिले- ’बायोपिकसाठी नवीन खेळाडू शोधत आहे.’ शिवाय भारताच्या पराभवानंतर क्ष्झ्रहरल्ूग् असा हॅशटॅग टिवटरवर ट्रेंड करू लागला.

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्‍या टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 151 धावा केल्या. भारतासाठी कर्णधार विराट कोहलीने शानदार डाव खेळला आणि 49 चेंडूत 57 धावा पूर्ण केल्या, तर ॠषभ पंतने 30 चेंडूत 39 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा घाम गाळला. मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत 79 आणि बाबर आझमने 52 चेंडूत 68 धावा करत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!