लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.श्रीकांत आवारे –
निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)
लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली.सभेत असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिरवाडे वाकदचे सरपंच तथा आवारे हॉस्पिटलचे संचालक डॉ.श्रीकांत आवारे (लासलगाव) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती माजी अध्यक्ष डॉ विजय केंगे यांनी दिली आहे
डॉ असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर सोनल सोनवणे, सचिव पदी डॉक्टर स्वप्नील जैन, सहसचिवपदी डॉ.नितीन न्याहारकर तसेच खजीनदारपदी डॉ.अमोल शेजवळ यांची निवड करण्यात आली. महिला प्रतिनिधी म्हणून डॉ.रसिका यूवराज पाटिल व डॉ.प्रियंका अमोल गायकर यांची सन २०२१/२२ या काळासाठी निवड करण्यात आली.याप्रसंगी माजी अध्यक्ष डॉ.विजय केंगे,डॉ.विलास कांगणे,डॉ.सुजित गुंजाळ,डॉ.विकास चांदर, डॉ.कैलास पाटील,डॉ.अमोल गायकर,डॉ.गौरव माठा,डॉ.विक्रम होळकर,डॉ.अनिल ठाकरे आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल खा डॉ भारतीताई पवार,मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार,मविप्रचे डॉ तुषार शेवाळे,जि प सदस्य डॉ आत्माराम कुंभार्डे,मविप्र संचालक डॉ सयाजीराव गायकवाड, माजी आमदार कल्याणराव पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा ताई जगताप, जि प सदस्य डि के नाना जगताप, लासलगाव ख वि संघाचे संचालक दत्तात्रय डुकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उन्मेष डुंबरे,पं समिती सदस्य शिवा पाटील सुरासे, केंद्रीय पत्रकार संघाचे संघटक रामभाऊ आवारे, पत्रकार किरणकुमार आवारे, वैद्यकीय अधिकारी डॉ कल्याण शिंदे (खडक माळेगाव),मविप्र सेवक सोसायटीचे मा चेअरमन आर आर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बबनराव शिंदे, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष रविराज शिंदे , युवानेते केशवराव जाधव, जयश्री बॅंकेचे अध्यक्ष छोटुकाका पानगव्हाणे, वनसगाव सरपंच महेश केदारे, प्रमोद पवार, सरपंच तुकाराम गांगुर्डे, विकास रायते, बापुसाहेब गारे, विठ्ठलराव कान्हे, धनंजय डुंबरे, प्रल्हाद डुंबरे आदींनी अभिनंदन केले आहे.