पोलीस स्मृतीदिनानिमित्त कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचा झाला सत्कार

जळगाव (प्रतिनिधी)-

भारत तिबेटियन सीमेवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्ती व चीनी सैन्याने हल्ला केला होता त्यात भारताचे दहा जवान शहीद झाले होते त्यांच्या स्मृतीस उजळा म्हणून भारतीय पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो केंद्रीय राखीव पोलीस दल भारतातील सर्वात मोठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे व जगातील सर्वात मोठी निमलष्करी दल मानले जाते
दिनांक २१ रोजी महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुप व अखिल भारतीय ग्राहक संरक्षण महिला दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने एसपी ऑफिस जळगाव येथे पोलीस स्मृतिदिनानिमित्त एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी जळगाव कौटुंबिक वादातून पाच वर्षांच्या मुलासह मेहरूण तलावात उतरून आत्महत्या करायला गेलेल्या नाथवाड्यातील महिलेला तलावातून बाहेर काढुन जीव वाचवणार्‍या महिला पोलिसांचा व पोलिस कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व फुल गुच्छ देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन सविता माळी यांनी केले होते एमआयडीसीचे पीएसआय रवींद्र गिरासे श्रीराम बोरसे जितेंद्र राजपूत मीनाक्षी संगीता पवार वहिदा तडवी योगिता पाचपांडे यांचा गौरव करण्यात आला उपस्थित महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण राजपूत अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख एडवोकेट सुभाष तायडे व जी एम तळेले अक्षय हिरोडे वंदना पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन वंदना पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला दक्षता समिती सदस्य व रक्षक सेना जिल्हा अध्यक्ष सविता माळी यांनी केले

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!