पाकिस्तानी रुपया घसरुन आता पर्यंतच्या सर्वांत खालच्या स्तरावर

नवी दिल्ली,

अंतर बँक मुद्रा बाजारामध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरु असून बुधवारी पाकिस्तानी रुपया ग-ीन बँकेच्या तुलनेत आता पर्यंतच्या सर्वांत खालच्या स्तरावर 173.50 रुपयांवर आला आहे. व्यवसायीक दिवसाच्या सुरुवातीला ग-ीन बँकमध्ये 37 पैसे चढला असल्याची माहिती एआरवाय न्यूजने दिली.

पाकिस्तानचा रुपया सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 172.72 रुपयांवर बंद झाला होता. विनिमय दरावर दबावाला कमी करण्यासाठी स्टेट बँकेद्वारा सुरु करण्यात आलेल्या अनेक उपायानंतरही अमेरिकी डॉलरची वाढती मागणी याच्या मुल्याला वाढवत आहे.

बातमीमध्ये सांगण्यात आले की याच्या आधी केंद्रिय बँकेने विनिमय कंपन्यांद्वारा विदेशी मुद्रा देवाण घेवाणमधील पारदर्शिता वाढविणे आणि विदेशी मुद्राच्या अवांछित बहिर्वाहला रोखण्यासाठी नियामक उपयांची सुरुवात केली.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानद्वारा प्रसिध्द केलेल्या दिशा निर्देशांनुसार अफगाणिस्तानचा प्रवास करणार्‍या व्यक्तींना प्रति व्यक्ती फक्त 1 हजार डॉलर घेऊन जाण्याची परवानगी असेल याची अधिकत्तम वार्षिक मर्यादा 6 हजार डॉलर असेल.

एक्सचेंज कंपन्यांना सर्व विदेशी मुद्रा विक्री देवाण घेवाणीसाठी 500 डॉलर आणि यापेक्षा अधिक आणि जावक प्रेषणासाठी बायोमेट्रिक सत्यापन करण्याची आवश्यकता असेल आणि हे नियम 22 ऑक्टोबर पासून लागू होतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!