आज पुन्हा सर्वसामान्यांना महागाईचा झटका; 35 पैशांनी महागलं पेट्रोल-डिझेल
नवी दिल्ली,
सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर 35 पैशांनी महागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात येत आहे. इंडियन ऑॅइल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलची किंमत आता 94.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. सलग महाग होणार्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
एकीकडे पेट्रोल पंपावरच्या मीटरचे आकडे दररोज वाढत चालले आहेत आणि तेवढ्याच वेगानं तुमचा-आमचा खिसाही रिकामा होत चालला आहे. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 35 पैसे तर डिझेलच्या दरात 40 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 112 रुपये तर डिझेलसाठी 103 रुपये मोजावे लागत आहेत. परिणामी महागाई देखील वाढणार हे सांगण्यासाठी अर्थतज्ज्ञाची गरज नाही. इंधन दरवाढीला ब-ेक तरी कधी लागणार असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जातोय. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यामुळं परिवहनासोबतच भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही कडाडल्या आहेत.
देशातील प्रमुख महानगरांतील दर :
देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपयेलिटर डिझेल रुपयेलिटर
दिल्ली 105.84 94.57
मुंबई 111.77 102.52
कोलकाता 106.43 97.68
चेन्नई 103.01 98.92
पेट्रोल-डिझेलच्या दरांत का होतेय सातत्यानं वाढ?
जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे.
देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी
देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध- प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत.