विजयादशमी निमित्त शस्त्र पूजन कार्यक्रम…
सावदा प्रतिनिधी
सावदा पोलीस स्टेशन येथे विजयादशमी निमित्त शस्त्र पूजन कार्यक्रम परंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला…. प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री डी .डी. इंगोले साहेब , पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र पवार साहेब ,पोलीस उपनिरीक्षक( पी .एस .आय.)श्री समाधान गायकवाड साहेब यांनी शस्त्रागारातील उपलब्ध शस्त्रांची मनोभावे पूजा केली. एक दिवस आधी शास्त्रांची देखभाल करण्यात आली .आज विजयादशमी निमित्त शुभ मुहूर्तावर शस्त्रांचे विधीवत पूजन केले गेले .सकाळी मोठ्या उत्साहात सर्व शस्त्रांचे पुजन माल्यार्पण करण्यात आले. भारतीय संस्कृती ही पूजक संस्कृती आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण पूजनाने करतो. एवढे महत्व पूजनाला आहे. “सदरक्षणाय, खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्या प्रमाने पोलीस प्रशासन सामान्य जनतेच्या पाठीशी आहे व जे ‘खल ‘ प्रवृत्तीने वागतील त्या प्रवृत्तीचा समुळ बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्मानीय श्री. डी.डी. इंगोले साहेब यांनी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले या प्रमाणे कार्यालया जवळील मोठ्या नवीन हॉलमध्ये हा कार्यक्रम साजरा झाला. याप्रसंगी सर्व पदाधिकारी मान्यवरांनी हॉलमध्ये पूजन केले . आशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी स्टाफ चे पोलिस कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.अतिशय प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाचा खरोखर हा एक स्तुत्य उपक्रम आहे