तारुखेडले ची “रोगविनाशिनी” शितला देवी-

नवरात्र विशेष करीता-(रामभाऊ आवारे वनसगाव.८७८८५०४५१२)

नवरात्रौत्सवात दैवीशक्तीचा अगाध महिमा दुर्गासह अन्य विविध रूपात पहायला मिळणार आहे. याच शृंखलेत निफाड तालुक्यातील तारुखेडलेची ‘रोगविनाशिनी’ म्हणून नावाजलेल्या माता शितलादेवीचा नवरात्रौत्सव देखील मोठया उत्साहात संपन्न होत आहे.
कांजण्या, गोवर आणि देवी रोगावर देवीच्या कृपेने ‘शितलता’ प्राप्त होते अशी आख्यायिका असताना अनेकांना संसारीक त्रिविधा तपातून मुक्तता मिळाल्याचे अनुभव येथे कथन केले जात आहेत. तारुखेडले येथे शितलादेवीचे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे तारुखेडले गावातील ग्रामस्थ श्री. पुंडलिक विठोबा चव्हाण यांचे आजोबा कै. सयाजी काळू चव्हाण हे शंभर वर्षांपूर्वी चोंडी – मेंढी येथून तारुखेडले या गावी आले त्यावेळी तारुखेडले या गावी मारुती व इतर देवतांचे त्यात शितला देवीची मूर्ती ही होती
कै. चव्हाण यांनी मारुती मंदिराला विटा दिल्या व मंदिर बांधकाम करण्यात आले सर्व देव मंदिरात गेले परंतु शितला देवी गेली नाही त्यानंतर श्री पुंडलिक चव्हाण यांचे वडील व चुलत्यांनी या देवीची सेवा केली श्री. चव्हाण यांचे वडील देवीला कौल लावून लहान मुलांचे दुखणे उदी लावून बरे करत असे आता श्री. पुंडलिक चव्हाण व त्यांच्या कुटुंबाने तारुखेडले येथे देवीचे मंदिर बांधले असून देवीची नित्यनेमाने सेवा करत आहेत या शितलादेवीच्या जागृततेच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात येथील पुजारी असलेल्या फुलाबाई राजाराम क्षीरसागर यांनीही आपल्याला देवी कृपेचा ज्वलंत अनुभव आल्याचे सांगितले. तर केवळ तारुखेडले आणि आसपासच्या भागांमधूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातुन अनेक भक्त याठिकाणी दर्शनासाठी येतात तर ज्या लहान मुलांना देवी, गोवर किंवा कांजण्या आल्या असतील अशांना या मंदिरात आवजरून आणले जाते. देवीच्या पूजेबरोबरच देवीच्या स्नानाचे तीर्थ या मुलांच्या अंगावर शिंपडल्यानंतर त्यांची काहीली कमी होते, असा अनुभव अनेकांचा आहे. प्रतिवर्षाप्रमाणो नवरात्रौत्सव या ठिकाणी मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. या काळात भजन, किर्तन यांसह गोंधळ असे विविध धार्मिक कार्यक्रम याठिकाणी आयोजिले जातात. यंदाही या कार्यक्रमांची रेलचेल असल्याची माहीती तारुखेडले ग्रामस्थ श्री. प्रशांत गवळी यांनी दिली .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!