युवाशक्ति फाउंडेशन चा अप्रतिम उपक्रम लसिकरणासाठी करणार जन जागृती
रावेर – शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )
११ आक्टो . आज
कोरोनाचा प्रादुर्भाव हा बराच आटोक्यात आला असुन प्रत्येक स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर रावेर नगर पालिका व ग्रामीण रुग्णालय रावेर यांच्या संयुक्त विद्ममाने मिशन *कवच कुंडल अंतर्गत रावेर शहरात विविध ठिक ठिकाणी लसीकरण कँम्प घेऊन लसिकरण मोहिम राबविण्यात येत आहे .तरी शहरात लसिकरणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून येथील नगरपालिकेचे माजी उपनराध्यक्ष व आरोग्य सभापती अॅड. सूरज चौधरी यानी रावेर विकास युवाशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात व परिसरात लसीकरण जनजागृतीसाठी फिरता रथ तयार केला आहे. या फिरत्या रथाचे नगरसेवक सुधीर पाटील यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आले, त्या अनुषंगाने आज रावेर भागात
फिरत्या जनजागृती रथाचा शुभारंभ करताना आरोग्य सभापती सूरज चौधरी, श्री भास्कर महाजन,अँड राहुल मुजुमदार, राहुल चौधरी,रावेर न.पा. कार्यालय प्रमुख काळे साहेब,आरोग्य निरीक्षक युवराज गोयल, सुभाष चौधरी, भावलाल शिंदे,सुनिल चौधरी, अनिल चौधरी, दिलीप बारी, संजय चौधरी,ज्ञानेश्वर चौधरी, सलीम भाई,तुषार मानकर ,संतोष भोई,विलास चौधरी,किरण चौधरी, अमोल कासार, पंकज चौधरी, रमेश महाजन,निलेश महाजन,काशिनाथ भोई,गणेश शिंदे,प्रफुल्ल कासार,नत्थू महाजन, शिवा,सागर चौधरी उपस्थित होते.
_____________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832