सुसरी येथील शाळेतील भिंती चमकु लागल्या

वरणगाव (प्रतिनिधी)

जि. प . शाळा सुसरी येथे लोकसहभागातून शाळेचा विकास व्हावा व शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी शाळा स्तरावरून विविध प्रयत्न केले जातात . याअंतर्गत गावातील श्री . पंढरीनाथ काशीनाथ पाटील यांनी त्यांचा मुलगा वीर जवान ईंश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेला १०,००० रु . दिले . या रकमेतून शाळेचे बाह्यरुप अतिशय आकर्षक झालेले आहे .बाला पेंटिग, विदयार्थी मुलभुत अध्ययन क्षमता वाढावी यादृष्टीने भिंतीवर बोलके चित्र काढलेले आहे .
श्री . पंढरीनाथ पाटील हे त्यांचा मुलगा वीर जवान ईश्वर पाटील यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात व गावात सक्षम विद्यार्थी घडावा म्हणून विविध उपक्रम राबवतात . यापुर्वी त्यांनी शाळेतील सर्व विदयार्थ्यांना स्वेटर दिले होते . यावेळेस शाळेच्या रंगकामासाठी दहा हजार रुपये व विदयार्थ्यांना पाणी पिण्यासाठी सहा ग्लास, दोन तांबे व ट्रे दिला आहे .
श्री . पंढरीनाथ पाटील व त्यांच्या पत्नी सौ . सुनिता पाटील यांच्या कडून दहाहजार रक्कम स्विकारतांना शाळेच्या मुख्याध्यापिका. दिपाली भंगाळे व शिक्षिका मीरा पाटील- जंगले

शाळेचा विकास करतांना व गुणवत्तापूर्ण शिक्षण देतांना गावातील पालकांचे सहकार्य व लोकसहभाग मिळत राहिल्यास लवकरच शाळेची पटसंख्या वाढेल .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!