पॅलिस्टिनी -इस्त्रायलमध्ये शांती प्रक्रियेवर चर्चा

रामल्लाह,

पॅलिस्टिनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी वेस्ट बँक शहर रामल्लाहमध्ये पॅलिस्टिनी -इस्त्रायलमध्ये शांती प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी इस्त्रायलच्या दोन मंत्र्या बरोबर चर्चा केली.

सिन्हुआ वृत्तसंस्थेने डब्ल्यूएएफएचा हवाला देत माहिती दिली की रविवारी इस्त्रायलचे आरोग्यमंत्री नित्जान होरोविटज आणि क्षेत्रीय सहयोग मंत्री इसावी फ्रेज बरोबर बैठकीच्या दरम्यान अब्बासनी म्हटले की आंतरराष्ट्रीय प्रस्तावाच्या अमंंलबजावणीच्या माध्यामातून इस्त्रालयच्या ताब्याला समाप्त करणे आणि क्षेत्रामध्ये न्यायपूर्ण आणि व्यापक शांती स्थापित करणे महत्वपूर्ण आहे.

राष्ट्रपती अब्बास यांनी इस्त्रायलच्या वस्ती वसविण्याला थांबविणे, पॅलिस्टिनी वस्ती आणि गावावरील छापेमारीला थांबविणे आणि पूर्व यरुशलममध्ये पॅलिस्टिनींच्या घराना नष्ट करणे आणि विस्थापनाला थांबविण्याच्या आवश्यकतांवर जोर दिला.

इस्त्रायलच्या दोनीही मंत्र्यांनी अब्बास यांना आपल्या स्थिती बाबत सांगितले जे दोनीही राज्यातील समाधान आणि दोनीही बाजूमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी संयुक्तपणे सहयोगाचे समर्थन करत आहे.

राष्ट्रपती अब्बास आणि इस्त्रायली मंत्री आणि अधिकार्‍यांमध्ये झालेली बैठक ही मागील तीन महिन्या पासून होत आहे. कारण मार्च 2014 पासून द्विपक्षीय शांती चर्चा थांबली होती.

इस्त्रायल आणि पॅलिस्टिनींच्या दरम्यान अमेरिका प्रायोजीत चर्चा 2014 मध्ये इस्त्रायलकडून करारावर असहमती व्यक्त करणे आणि 1967 च्या सीमेवर एक पॅलिस्टिनी राज्याच्या स्थापनेला मान्यता देणे बंद झाले आहे. इस्त्रायलने 1967 मध्ये मध्यपूर्व मधील युध्दात वेस्ट बँक आणि पूर्व यरुंशलमवर कब्जा केला आणि यावर पॅलिस्टिनीनी दावा केला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!