दसनुर गावात विनामूल्य घरोघरी माहिती देणारा व्हाट्सएप ग्रुप..

बलवाडी प्रतिनिधि:- (आशिष चौधरी )

आपण सगळेच मनोरंजन साठी व्हाट्सएप वापरतो पण त्याचा अतिआवश्यक माहिती साठी चांगला उपयोग घेऊ शकतो तसेच दसनुर गावातील विशाल अशोक पाटील याने 1/7/2017 सालापासून दसनुर ग्राम अपडेट नावाने ग्रुपची सुरुवात केली आता या ग्रुपच्या 3 शाखा आहेत व महिला ग्रुपच्या 2 शाखा आहेत असे एकूण 5 ग्रुप आहेत व यात नावीन्य असे की या ग्रुप मध्ये ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, डॉक्टर, कृषी अधिकारी, सरकारी डॉक्टर , अंगणवाडी सेविका, विद्युत पुरवठा कर्मचारी, एम.एस.इ.बी.साहेब, इतर सर्व एड आहेत आता या ग्रुप चे वैशिष्ट्य,
🟣गृप मध्ये शासकीय योजना माहिती देने
🟣 गावातील लाईट फोल्टी असल्यास वायरमन शी संपर्क साधून गावात मेसेज देने
🟣 तलाठी ऑफिस मध्ये हजर असल्यास माहिती देणे
🟣ग्रामपंचायत पाणी पुरवठा समस्या किंवा वेळेबद्दल माहिती देणे
🟣गावात बाजाराबद्दल माहिती देणे
🟣तसेच गावात काही दुःखद घटना घडल्यास शोकसंदेश देने
🟣तसेच या ग्रुपच्या माध्यमातून हरविलेल्या वस्तू देखील माहिती मुळे ताब्यात दिल्या आहेत
अजून बऱ्याच गोष्टी या ग्रुपच्या माध्यमातून माहिती देतात व बोध घ्यायला शिकवतात गावीगावी ग्रुप बद्दल कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!