घर हाकेच्या अंतरावर असताना मृत्यूने कवटाळले भुसावळ तालुक्यातील फुलगाव रेल्वे उड्डाणपूल बायपास जवळ युवकाचा भीषण अपघात

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी

फुलगाव बायपास येथे दिनांक 13 रोजी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान एका युवकाच्या टू व्हीलर गाडीला अनोळखी वाहनाने जोरदार धडक देऊन युवकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे
सविस्तर वृत्त असे की
फुलगाव येथील राकेश पांडुरंग चौधरी वय 29 हे जळगाव येथील
leedskem (india) L T D येथे सुपरवायझर या पदावर कार्यरत असतांना फुलगाव ते जळगाव दैनंदिन असा त्यांचा रोजचा प्रवास करत असत आपल्या परिवारात आनंदाने जीवन जगत असताना रविवारी रात्री जळगाव येथून कंपनीतून आपले दैनंदिन काम आटपून आपल्या राहत्या घरी फुलगाव गावाच्या हाकेच्या अंतरावरच बायपास सर्विस रोड वर काळाने घात केला

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तरसोद फाटा ते चिखलीचे रस्त्याचे काम नॅशनल हायवे अथोरिटी इंडिया च्या अधीन सुरू आहे फुलगाव बायपास सर्विस रोड आज रोजी अपूर्ण आहे
फुलगाव गावातील गावकऱ्यांना भुसावळकडून फुलगाव गावात जाण्या-येण्यासाठी एकच रस्ता असल्याकारणाने हायवे रस्ता हा एका बाजूने धोका पत्करून क्रॉस करावा लागतो
फुलगाव उड्डाणपुलावरून अनोळखी वाहन भरधाव वेगात भुसावळच्या दिशेने निघाले असता त्यांचवेळेस राकेश पांडुरंग चौधरी हे भुसावळ वरुन फुलगाव बायपास रस्ता क्रॉस करत असताना राकेश यांना जबर धडक देऊन अनोळखी वाहन हे फरार झालेले आहे
तर अपघात ठिकाणी घटना घडल्या नंतर फुलगाव गावातील गावकर्‍यांचा खुप मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण होत मोठा जमाव जमा झाला असता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप कुमार बोरसे हे तात्काल घटनास्थळी हजर होऊन योग्य ते आश्वासन देऊन परिस्थिती आटोक्यात आणुन जमावाला शांत करत रस्ता मोकळा करण्यात आला होता
सदरहून कंपनीने फुलगाव बायपास चे काम लवकर पूर्ण केले असते तर एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला नसता
राकेश यांच्या मृत्यूने आई वडील दोन बहिणी पत्नी व दोन वर्षाचे छोटे बाळ पोरके होऊन गेले आहे गावामध्ये अशा दुःखद घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे
फुलगाव बायपास च्या कामात दिरंगाई केल्यामुळे
संबंधित रस्ते व पूल निर्माण हायवेच्या अधिकाऱ्यांवर राकेश यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत योग्य तो गुन्हा दाखल करून व मयत राकेश पांडुरंग चौधरी च्या परिवाराची जिम्मेदारी घेऊन 20 लाखाची तातडीने मदत करावी अशी नातेवाईक व समस्त फुलगाव गावकऱ्यांनी केलेली आहे

अनोळखी वाहना विरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!