खडकपुर्णा प्रकल्पामधुन पाण्याचा विसर्ग नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जालना,
खडकपुर्णा प्रकल्पाचे एकुण 19 वक्र दरवाजे 1 मीटरने दि. 28 सप्टेंबर 2021 रोजी उघडली असुन नदीपात्रात 71 हजार 843 क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला असुन नदीकाठच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी चालमालमत्ता,चिजवस्तु,वाहने, जनावरे ,पाळीव प्राणी व शेती औजारे आदी साधन सामुग्री सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले असुन धरणाच्या खालील नदी काठावरील नागरी भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नदीपात्रात सोडण्यात येणार्या पूर विसर्गाबाबत इशार्याचे गांर्भीय लक्षात घेता नागरिकांच्या जिवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जालना यांनी एका आदेशाद्वारे दिले आहेत.