नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्रातील आजी आजोबांसाठी नेत्र तपासणी व चष्मे वाटप हा स्तुत्य उपक्रम

जळगाव,

नारी शक्ती ग्रुप जळगाव तर्फे बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांसाठी नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप हा कार्यक्रम मांगीलालजी बाफना नेत्रपेढी जळगाव येथे दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 10: 00 वाजता आयोजीत करण्यात आला. यात आदित्य ढवळे पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्था बेघर निवारा केंद्र येथील एकूण 32 जणांची नेत्रतपासणी केशव स्मृती प्रतिष्ठान व आरसी बाफना फाऊंडेशन संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय या ठिकाणी डॉ.नयना उभाड पाटील एम. एस.ऑप्थो. यांनी केली. या उपक्रमाची संकल्पना नारीशक्ती अध्यक्ष सौ मनिषा पाटील व सौ सुमित्रा पाटील यांची असून यात नारीशक्ती पदाधिकारी अध्यक्ष सौ मनीषा पाटील, गायत्री पाटील म न पा व्यवस्थापक राजश्री डोलारे ,भावना चौहान, ॲड वैशाली बोरसे,नूतन तासखेडकर, माधुरी शिंदे, तसेच किरण तोडकरी, मनोज कुलकर्णी व दीपक चौधरी यांचे सहकार्य लाभले. नारीशक्ती ग्रुप जळगाव यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!