केंद्रीय आयएएस संघटनेकडून, टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतले रौप्यपदक विजेते आयएएस अधिकारी सुहास एल. वाय आणि ऑॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांचा सत्कार

नवी दिल्ली

टोक्यो बॅडमिंटन पॅरालिम्पिक स्पर्धेत उत्तरप्रदेश तुकडीचे सनदी अधिकारी (आयएएस) सुहास ललीनकेरे यतिराज यांनी रौप्यपदक तर टोक्यो ऑॅलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल, केंद्रीय आयएएस संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, यांनी या कार्यक्रमात व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला. देशात क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील, ते करावेत, असा सल्ला त्यांनी सर्व सनदी अधिकार्‍यांना दिला. सुहास एल वाय यांनी पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून,संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. टोक्यो ऑॅलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या भारताच्या अभूतपूर्ण यशामुळे, भारतातील नागरिकांमध्ये खेळांप्रती अत्यंत उत्साह आणि रुची निर्माण झाली आहे, याचा सकारात्मक परिणाम नक्कीच देशातील क्रीडाक्षेत्राच्या भवितव्यावर होईल, असेही अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेला, नवा भारत- तंदुरुस्त भारत घडवण्यासाठी,प्रत्येकाने आपल्या कामाव्यतिरिक्त काहीतरी खेळ खेळावा, अशी सूचना त्यांनी केली. पॅरालिम्पिक स्पर्धेत 19 आणि ऑॅलिम्पिक स्पर्धेत 7 सुवर्णपदक जिंकत, आजवरची सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या, सर्व खेळाडूंचा देशाला अभिमान वाटतो, असे, अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलतांना, त्यांनी देशात क्रीडाविषयक घडामोडी आणि उपक्रमांवर नव्याने भर दिला जात असल्याकडे लक्ष वेधले. देशात क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने, खेळांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत ज्यांचे दृश्य परिणाम नजीकच्या भविष्यात आपल्याला दिसतील, असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!