मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा आश्रम शाळेचा एक अनोखा उपक्रम
दैनिक महाराष्ट्र सारथी प्रतिनिधी,
सविस्तर वृत्त असे: मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा स्वर्गीय लक्ष्मी नारायण चौधरी भटक्या विमुक्त जाती जमाती आश्रम शाळा यांनी एक अनोखा उपक्रम केला आहे. दीड वर्षापासून कोरोना मुळेमुलांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी शाळेतील सर्व सर्व शिक्षकांनी शाळेला लागून असणारे सर्व खेडी पाळी मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्या पर्यंत जाऊन. त्यांना पुस्तक वाटपाचं कार्य करत आहेत. त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही. याची काळजी सर्व शिक्षक वृंद घेत आहेत. व वेळोवेळी मार्गदर्शन व आपल्या अनुभवातून मुलांना पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.अशा या कार्यात शाळेचे मुख्याध्यापक टी.एस .जुंगरे सर,अर.एस.महाजन सर, सोनवणे सर, महेंद्र चौधरी सर, मुळे सर, सपकाळ सर, पवार सर हटकर सर, नीलेश चौधरी सर भंगाळे सर, पाटील सर, सुरवाडे सर या सर्व शिक्षकांनी आदिवासी मुलांना पुस्तके वाटण्याचे काम करत आहेत.