भुईमूग विक्रीसाठी भूसार मार्केट उपलब्ध! स्पर्धेतून चांगला भाव मिळेल : सभापती खोतकर
जालना
भुईमूगाचे उत्पादन यंदा वाढले असून चांगला भाव मिळाला पाहिजे या हेतूने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे पुर्वी भाजी व किरकोळ मार्केट मध्ये विक्री होणार्या भुईमूगासाठी भुसार मार्केट परिसरात विक्री ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकर्यांनी भुईमूग भुसार मार्केट मध्ये विक्रीस आणावे. असे आवाहन सभापती अर्जुनराव खोतकर यांनी केले आहे.
अधिक माहिती देतांना श्री. खोतकर म्हणाले, खरिप हंगामातील लवकर उत्पन्न देणारे पिक म्हणून भुईमूग लागवडीकडे शेतकर्यांचा कल असतो . बाजार समितीत उलाढाल ही सुरू राहते.मध्यंतरी उत्पादन घटल्याने भुसार मार्केट ऐवजी भाजी व किरकोळ मार्केट मध्ये भुईमूग विक्री होत होती.तथापि यंदा उत्पादनात वाढ झाली. हे लक्षात घेऊन भुसार मार्केट विक्री साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. येथे मोठे खरेदीदार असून स्पर्धा निर्माण होऊन चांगला भाव मिळेल. या दृष्टीने बाजार समिती ने सदर निर्णय घेतल्याचे सांगून शेतकर्यांनी भुसार मार्केट मध्ये भुईमूग विक्रीसाठी आणावा. असे आवाहन सभापती अर्जुनराव खोतकर, उपसभापती भास्करराव पाटील दानवे, सचिव रजनीकांत इंगळे यांच्या सह संचालक मंडळाने केले आहे.