एरंडोल येथे पुजारीच्या पत्नीची आत्महत्या

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी.

एरंडोल येथील देशपांडे गल्लितील विठ्ठल मंदीराचे पुजारी दत्तात्रय भागवत यांच्या पत्नी ज्योती दत्तात्रय भागवत (वय ३९) यांनी विठ्ठल मंदीरात छतास दोर अडकवून गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना ११जून२०२१ रोजी दुपारी १:४५वाजेच्या सूमारास घडली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

एरंडोल पोलिस स्टेशन सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी की एरंडोल येथील देशपांडे गल्लितील विठ्ठल मंदीराचे पुजारी दत्तात्रय केशव भागवत व त्यांच्या पत्नी ज्योती भागवत हे दाम्पत्य मंदीरास लागून असलेल्या खोल्यांमध्ये वास्तव्यास आहेत. ११जून रोजी दत्तात्रय भागवत हे सकाळी १०वाजेपासून कासोदा येथे खाजगी कामानिनित्त गेले होते. दुपारी १:४५ वाजता ते परत आले असता त्यांना मंदीर बंद आढळून आले. म्हणून त्यांनी पत्नी ज्योती यांना फोन केला परंतु ज्योती यांनी फोन उचलला नाही.त्यानंतर त्यांनी मंदीराच्या आजुबाजूला शोध घेत विचारपूस केली.त्यांना त्यांची पत्नी ज्योती या दिसून आल्या नाहीत.

भागवत यांच्या सोबत असलेला योगेश देशपांडे हे मंदीराच्या वर चढून मंदीरात खाली उतरले तेव्हा त्यांना ज्योती ह्या मंदीरास असलेल्या छताच्या कडीला सूताच्या दोरीने गळफास लावून वर लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्या.तेव्हा योगेश देशपांडे याने मंदीराचा दरवाजा उघडून दत्तात्रय भागवत यांना आवाज दिला तसेच त्यांनी व परीसरातील लोकांनी ज्योती भागवत यांचा मृतदेह खाली उतरवला व खाजगी वाहनाने ग्रामीण एरंडोल येथील रूग्णालयात नेला असता डॉक्टरांनी ज्योती यांना मृत घोषित केले.

याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ममता तडवी, श्रीराम पाटील, पंकज पाटील, संदीप सातपुते व अकील मुजावर हे करीत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!