तामसवाडी येथे घाणीचे साम्राज्य डासांचा सुळसुळाट

तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधी – दि.१८/०९/२०२१ ( राजेश वसंत रायमळे )

तामसवाडी ता.रावेर येथे पावसाचे पाणी तसेच घनकचरा साचलेले असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा सुळसुळाट वाढत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील महिनाभरापासून पावसाचा जोर कायम असल्याने जागोजागी साचलेले पावसाचे पाणी व घनकचरा यांमुळे डासांची पैदास वाढत असून लोकांमध्ये विषेश करुन लहान बालकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे.मगील एक-दिड वर्षापूर्वीच गावामध्ये डेंग्यू चा पेशंट आढळून आलेला होता.त्यामुळे सध्या चालू असलेली डेंग्यू मलेरिया चिकनगुणीयाची साथ आपल्याकडे येते की काय?अशी भीती निर्माण झालेली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!