प्रहारच्या तालुकाध्यक्षपदी नरेश वाढेकर।
जालना,
प्रहार जनशक्ती पक्षाच्या जालना तालुकाध्यक्षपदी जामवाडी ता. जालना येथील सक्रिय आणि निष्ठावंत प्रहार सैनिक नरेश सुभाषराव वाढेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जनआंदोलनात सुरुवातीपासूनच सक्रीय असलेले नरेश वाढेकर यांनी प्रहारचे कार्य एकनिष्ठेने केले असून दिव्यांग,शेतकरी हितासाठी केलेली आंदोलने, निवडणुकांमध्ये पक्षाचे प्रामाणिकपणे केलेले काम ,त्यांचे संघटन कौशल्य या कार्याची दखल घेत जिल्हा कार्याध्यक्ष तथा जि. प. सदस्य शिवाजी सवणे यांच्या शिफारशी नुसार सदर नियुक्ती करण्यात आली आहे.
ना. बच्चू कडू यांचे राजकीय अस्तित्व व सामाजिक विचार या संकल्पनेवर आधारित शेतकरी, कामगार, दिव्यांग बांधवांचे हित व पक्ष वाढीसाठी कार्य करावे. असे त्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात जिल्हाध्यक्ष श्रीमंत पाटील राऊत यांनी नमूद केले आहे. या नियुक्तीबद्दल नरेश वाढे कर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.