भारताने कसोटी क्रिकेटचा सन्मान केला नाही – न्यूमॅन

नवी दिल्ली,

इंग्लंड विरुध्दच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने या मालिकेचा सन्मान केला नाही आणि त्यांनी चौथ्या कसोटीच्या आधीच कोविड दिशा निर्देशांचे उल्लंघन करुन कसोटी क्रिकेटचा सन्मान केला नसल्याचा आरोप इंग्लांडचा माजी क्रिकेटर पॉल न्यूमॅनने केला.

इंग्लंडचा माजी क्रिकेटर पॉल न्यूमॅनने भारतीय संघामध्ये कोरोना रुग्ण समोर आल्याच्या कारणामुळे मॅनचेस्टरमध्ये होणार्‍या पाचव्या कसोटी सामन्याला रद्द करण्यात येणे आणि भारतीय क्रिकेटर, बीसीसीआय आणि आयपीएलवर निशाना साधला आहे. भारतीय संघाचा सहाय्यक फिजियो योगेश परमार पाचव्या कसोटीच्या आधी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. याच कारणामुळे पाचवा कसोटी सामना रद्द करावा लागला होता.

त्याने डेली मेलसाठी लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटले की जर भारताचे अधिकांश खेळडू यूएईमधील स्पर्धेत खेळण्यासाठी दुबईला गेले नसते तर पहिल्या दिवशी खेळाला सकाळी रद्द केले गेले नसते.

न्यूमॅनने म्हटले की कोणताही भारतीय खेळाडू ज्याचा आयपीएलसाठी करार आहे तो कसोटी खेळण्याचा धोका पत्करु शकत नाही कारण जर तो पॉझिटिव्ह आढळून आला असता तर त्याला इंग्लंडमध्ये अजून दहा दिवस थांबावे लागले असते आणि तो 19 सप्टेंबर पासून सुरु होणार्‍या आयपीएलला मुकला असता.

त्याने म्हटले की भारताने कसोटीतून माघार घेऊन मालिकेची समाप्ती केली नाही आणि चौथ्या कसोटीच्या आधीच कोविडच्या दिशा निर्देशांचे उल्लंघन करुन कसोटी क्रिकेटचा सन्मान केला नाही.

न्यूमॅनने लंडनमध्ये चौथ्या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्या कार्यक्रमाला कोविड प्रसारासाठी जबाबदार ठरविले.

न्यूमॅनने म्हटले की भारतीय संघामध्ये कोविड प्रकोपची सुरुवात लंडनच्या एका हॉटेलमध्ये कर्णधार विराट कोहली आणि अन्य खेळाडू व कर्मचार्‍यांसह शास्त्रीच्या उपस्थितीमुळे झाली होती. यात ओव्हल कसोटीच्या दोन दिवस आधी 150 पेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!