शेतकर्यांच्या नुकसानीची आ. कैलास गोरंट्याल यांनी केली पाहणी शासनाकडे पाठपुरावा करून भरपाई मिळवून देण्याची ग्वाही
जालना,
अतिवृष्टीमुळेे शेतकर्?यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकतीच पाहणी केली असून या वेळी त्यांनी विविध गावातील शेतकर्?यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहीती घेवून सदर भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
जालना जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकर्?यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक गोर गरीबांच्या घरांची पडझड होवून जनावरे देखील मृत्यूमुखी पडली आहेत. काल गुरूवारी आ. कैलास गोरंट्याल यांनी जालना विधानसभा मतदार संघातील बठाण बु., गोलापांगरी, कुंभेफळ, अंतरवाला आदि गावांना भेटी देवून थेट शेतात जावून शेतकर्?यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आ. गोरंट्याल यांच्या जवळ झालेल्या नुकसानीच्या व्यथा मांडतांना अनेक शेतकर्?यांना गहीवरून आले होते. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी उपस्थित शेतकर्?यांमधून करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्याशी आपली विस्तृत चर्चा झाल्याचे सांगून झालेल्या नुकसानीचे तलाठी व मंडळअधिकार्?या मार्फत तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी दिल्याचे सांगून भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर देखील पाठपुरावा करण्याची ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतकर्?यांना दिली.
कुंभेफळ येथील दौर्?यात बालासाहेब सिरसाठ, बाबासाहेब म्हस्के, रामेश्जर्?हाड, शेख शाकीर, बेलाअप्पा काटकर, काशिनाथ वाहुळ, गजानन गवारे, शिलाबाई वाहुळे, भानुदास फरांडे, रामकिसन सिरसाठ, गणेश औरंगे, अंतरवाला येथील दौर्?यात कृष्णा पडुळ, मनोहर सुळसुळे, राजीव भोईटे, अनिल ससाणे, बबन भोईटे, सचिन लोखंडे, बाळु लोखंडे, रमेश ढोकळे, सुरज पडुळ, अन्सीराम भोईटे, संताजी भोईटे, संतोष गायकवाड, मिठाराम सुळसुळे, जनाबा चाटे, बठाण बु. येथील दौर्?यात बबन विर, भाऊसाहेब हाडके, शिवाजी देवडे, संतोष देवडे, विठ्ठलराव बागल, नारायण पाटेकर, जीवन बागल, रामनाथ देवडे, विनोद बागल, सचिन बागल, संजय बागल, पिराजी उमप, संदिप देवडे, कृष्णा देवडे, राजीव बागल, सुरेश देवडे यांच्यासह शेतकर्?यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.