रावेर तालुका युवा मोर्चा उपाध्यक्षपदी राहुल सोनार यांची निवड. निंभोरा बु मध्ये राष्ट्रवादीला खिंडार..

निंभोरा बु.प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे. 9922358586 )

ओंकारेश्वर तालुका रावेर येथे भारतीय जनता पार्टीची तालुका बैठक, बूथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला.मेळाव्यात मार्गदर्शन करून अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्य कुशलतेनुसार पदांवर निवड करण्यात आली यात भाजपा युवा मोर्चा रावेर तालुका उपाध्यक्षपदी माजी मंत्री आ.गिरीष भाऊ महाजन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन राहुल जीवन सोनार यांची निवड करण्यात आली.त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पावती म्हणून तालुकास्तरीय उपप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्या कडे सोपविण्यात आली आहे.
राहुल सोनार यांच्या भाजपा पक्षात कार्यकर्त्यासह येण्यामुळे निंभोरा राष्ट्रवादी पक्षात खिंडार पडले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जत्रेचे स्वरूप असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्याची फळी सोनार यांच्या मागे आहे.मूर्ती छोटी असली तरी त्यांची कीर्ती महान आहे. जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन यांचा हाथ त्यांच्या पाठीशी असून रविंद्र महाले यांची साथ आहे.
यावेळी माजी मंत्री आ. गिरीषभाऊ महाजन, खा. रक्षाताई खडसे, जिल्हाअध्यक्ष राजु मामा भोळे, जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील, सुरेशजी धनके, पद्माकर महाजन, राजन लासूरकर, नंदकिशोर महाजन, प्रल्हाद भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाने महत्वपूर्ण जबाबदारी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी राहुल सोनार यांच्या वर युवा मोर्चा रावेर तालुका उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविला आहे.
राहुल सोनार यांची या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांच्या वर तालुकाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.व त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!