बापाची युक्ती अन् लेकाची मुक्ती: हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाला वडिलांनी असं काढलं बाहेर

नागपूर,

मागील काही काळापासून नागपूरसह देशात हॅनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग, सेक्सटॉर्शनच्या अनेक घटना समोर येत आहे. सायबर गुन्हेगार सोशल मीडियावरील भोळ्या लोकांना अलगद आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळतात. बदनामीच्या भीतीनं अनेकजण आरोपींच्या दबावाला बळी पडून त्यांना पैसे देतात. नागपूरात देखील हनीट्रॅपची अशीच एक घटना समोर आली आहे. पण संबंधित तरुणाच्या वडिलांनी युक्तीनं आपल्या लेकाची सुखरूप सुटका केली आहे. शिवाय आरोपीला गजाआड पोहोचवलं आहे.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी पीडित तरुणाला तन्वयी नावाच्या मुलीनं इन्स्टाग-ामवर फॉलो रिक्वेस्ट पाठवली होती. पीडित तरुणानं संबंधित रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघांत बोलणं सुरू झालं. हळूहळू दोघांच्या गप्पा वाढू लागल्या त्यानंतर दोघांनी एकमेकांचे व्हॉटसअ‍ॅपनंबर देखील एकमेकांना दिले. यानंतर व्हॉटसअ‍ॅपवरही दोघांचं बोलणं सुरू झालं. यानंतर दोघांत ईल विषयावर गप्पा रंगू लागल्या. दरम्यान एकेदिवशी तन्वयीनं पीडित तरुणाकडे न्यूड फोटोची मागणी केली.

मुलीच्या बोलण्याला भुलून पीडित तरुणानं आपले ईल फोटो संबंधित तरुणीला पाठवले आणि येथूनचं सुरू झाला हॅनिट्रॅपचा खेळ. यानंतर काही दिवसांनी एका अज्ञात नंबरवरून पीडित तरुणाला फोन आला. तसेच तुझे ईल फोटो आमच्याकडे आहेत. बदनामी टाळायची असेल तर दीड हजार रुपये दे अशी मागणी केली. आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित तरुणानं दीड हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपीनं पुन्हा फोन करून पाच हजार रुपयांची मागणी केली. पाच हजार दिल्यानंतरही पोट नाही भरलं म्हणून आरोपीनं पुन्हा साडेसहा हजार रुपये मागितले. यावेळीही तरुणानं आरोपीला पैसे दिले.

पण आरोपींची हाव काही कमी होतं नव्हती. त्यांनी पुन्हा धमकी द्यायला सुरुवात केली. यावेळी पीडित तरुणानं सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. वडिलांनी एक रुपयाही न देण्याच्या सुचना केल्या. पैसे न मिळाल्यानं आरोपीनं घरी येऊन पीडित तरुणाच्या वडिलांना आणि काकांना न्यूड फोटो दाखवले. तुमचा मुलगा माझ्या नात्यातील तरुणीला त्रास देतो, असा दावा आरोपीनं केला. आणि प्रकरण मिटवायचं असेल तर 50 हजार रुपये द्या अशी मागणी केली. वडिलांनीही पैसे द्यायचं मान्य केलं.

यानंतर वडिलांनी आरोपीला पैसे घेऊन जाण्यासाठी एका मंगल कार्यालयात बोलवलं. तत्पूर्वी वडिलांनी याची माहिती पोलिसांना देऊन ठेवली होती. आरोपी तरुण पैसे घ्यायला येताच, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. रौनक प्रभू वैद्य असं आरोपीचं नाव असून तो नागपुरातील हुडकेश्वरमधील पिपळा फाटा भागात राहतो. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!