निर्धाराला सलाम : ’अशा हल्ल्यांना घाबरणार नाही, काहीही झालं तरी कर्तव्य बजावत राहणार’

ठाणे,

’आपण कर्तव्य बजावतच राहणार हल्ल्यांना घाबरणार नाही’ असा ठाम निर्धार, ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी केला आहे. काल संध्याकाळी कासारवडवली भागात फेरीवाल्यांवर कारवाई करताना, एका फेरीवाल्यानं कल्पिता पिंपळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यात पिंपळे यांच्या हाताची 3 बोटं तुटली. ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडवणार्‍या फेरीवाल्यांविरोधात महापालिका प्रशासनानं विशेष मोहीम उघडली आहे. त्या कारवाई दरम्यान हा हल्ला झाला.

आम्ही अशा हल्लायांना घाबरणार नाही मी बरी होवून पुन्हा कारवाई करणार, आम्ही अधिकारी आहोत आमचं कर्तव्य आम्ही बजावणार असं कल्पिता पिंपळे यांनी म्हटलं आहे. कल्पिता पिंपळे यांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्यार्‍या फेरीवाल्यांविरोधात महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे दरम्यान सोमवारी संध्याकाळी कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर एका फेरीवाल्याने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या हाताची तीन बोटं तर अंगरक्षकाचे एक बोट कापलं गेलं.

ठाणे पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून अमरजीत यादव असं या हल्लेखोराचं नाव आहे. त्याच्या जवळचा चाकूही पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा हल्ला एवढा भयावह होता की घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या देखील मनात घडकी भरली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!