जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दशरथ नगर बहुद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव वार्ताहर
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळगाव शहरातील दशरथ नगर वस्ती मध्ये दशरथ नगर बहुद्देशीय संस्थेच्या वतीने परिसरामध्ये वृक्षारोपण चा कार्यक्रम करण्यात आला.
संस्थेचे सदस्य संदीप पवार यांनी पर्यावरण विषयी आपले विचार मांडले शासनामार्फत झाडे लावा झाडे जगवा’ ही संकल्पना राबविली जात आहे. व प्रत्येक वर्षी वृक्षारोपण पण केलं जातं पण जी झाडे लावली जातात, त्याच्यातली जगतात किती ? किंवा जगविण्याचे प्रयत्न किती केले जातात, याचा विचार व्हायला हवा! फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांचं संवर्धनसुद्धा करणं, ही काळाची गरज आहे. आपण जसे झाड लावतो तसे त्याचे संवर्धन करून त्याला मोठे करण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून आपण लावलेले वृक्ष पुढच्या काळात रूबाबात डोलतांना आपल्याला पाहायला मिळेल.
वृक्षारोपण करण्यासाठी आपण सर्वांनी स्वत:हून सहभाग घेतला पाहिजे. आपला किंवा आपल्या परिवारातील कुणाचा वाढदिवस असेल, तर त्या वाढदिवशी वृक्षारोपण करून त्या वृक्षाला वाढवल पाहिजे.
ती झाडं मोठी झाल्यावर आपण अभिमानानं सांगू शकतो ही झाडं आम्ही आमच्या वाढदिवशी लावली होती. त्याची एक कायमची आठवण आपल्याला राहील.
सदर कार्यक्रमाला दशरथ नगर बहुउद्देशीय संस्थेचे – सदस्य अनिल राऊत राजू कोळी संदीप पवार ज्ञानेश्वर पाटील शैलेंद्र ठाकूर आदी सदस्य उपस्थित होते.
करोना काळात ऑक्सीजन चे महत्व कळले असेल तर या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक तरी झाड लावावे